लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : ठाणे, नवी मुंबई, कल्याण, नाशिक व वसई विरार महानगरपालिकेने आशा स्वयंसेविकांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले. परंतु मुंबई महानगरपालिकेने आशा स्वयंसेविकांना बोनस जाहीर न केल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी सानुग्रह अनुदानासाठी भाऊबीजेच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर ओवाळणी मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना यंदा ठाणे महानगरपालिकेने सहा हजार रुपये, नवी मुंबई महानगरपालिकेने १४ हजार रुपये, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने ६ हजार रुपये, नाशिक महानगरपालिकेने ८५०० हजार रुपये आणि वसई – विरार महानगरपालिकेने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले. मुंबई महानगरपालिकेने आपल्या आरोग्य सेविकांना ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले. मात्र मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांकडे दुर्लक्ष केले आहे.

आणखी वाचा-मुंबई : पाच महिन्यांत ३१७ दलालांवर कारवाई

अन्य महानगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेविकांप्रमाणे आम्हालाही सानुग्रह अनुदान मिळावा या मागणीसाठी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या ७५० आशा स्वयंसेविकांनी भाऊबीजेच्या दिवशी आझाद मैदानामध्ये सकाळी ११.३० वाजता आंदोलन केले. आझाद मैदान पोलिसांनी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दुपारी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शिष्टमंडळाला भेट दिली.

दरम्यान, आशा स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सर्व अधिकारी व संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित करून ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन डॉ. शिंदे यांनी दिले. त्यानंतर आशा स्वयंसेविकांनी आपले आंदोलन स्थगित केले.