महाराष्ट्रात प्रगल्भ सांस्कृतिक परंपरा आहे. राजकारण एका बाजूला आणि कौटुंबीक संबंध एका बाजूला असतात. पवार कुटुंबीय नातेसंबंध जपत असतील; एकमेकांना अडचणीच्या, सुखदुःखाच्या प्रसंगी भेटत असतील, तर त्यात काही वावगं नाही. हे शोभनीय आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत दाखवणार आहे. यातून थोडं उद्धव ठाकरे यांनी शिकलं पाहिजे, असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिष शेलार म्हणाले, “‘एक सही भविष्यासाठी’ हा उपक्रम युवक विद्यार्थी आणि देशाच्या भविष्यासाठी आहे. ज्यांना कावीळ झाली आहे; त्यांना सगळे पिवळे दिसते. आदित्य ठाकरे यांना ती होऊ नये, अशी माझी इच्छा आहे.”

हेही वाचा : अजित पवार मुख्यमंत्री होतील का? बच्चू कडू म्हणाले, “पाच वर्षाचा कालखंड पाहिला तर…”

“आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी विरोधी भूमिका महाराष्ट्रात घेतली आहे. त्यांचे सरकार असताना विद्यापीठाच्या विरोधातले निर्णय घेतले गेले. सर्व निर्णय कुलगुरूंच्या कुलपतींच्या दालनात न होता, आदित्य ठाकरे यांच्या दालनात होत होते. विद्यापीठाच्या स्वायत्तेला बट्टा लावण्याचे काम आदित्य ठाकरे यांनी केले आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

हेही वाचा : “वाटेल ती किंमत मोजू पण… “, सत्ताधाऱ्यांचा उल्लेख करत रोहित पवारांचा थेट इशारा

“पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी परीक्षाच देऊ नये असा तुघलकी निर्णय त्यांनी घेतला होता. विद्यार्थ्यांच्या माथी करोना पदवीधर असा शिक्का मारून संधीपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंचा होता. विद्यापीठात थेट राजकीय नेमणुका करण्याचा कायद्यातील बद्दल हा आदित्य ठाकरे यांचा होता,” असा आरोपही शेलार यांनी लगावला आहे.