संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना टोला लगावत त्यांनी सकाळचे अभंग बंद करावे, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. ते मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते.

हेही वाचा – “भाजपाने काही पोपट पाळून ठेवले आहेत, त्यांना…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

काय म्हणाले आशिष शेलार?

स्वप्नील सावरकरांनी आताच उदय निरगुडकरांचा परिचय करून देताना म्हटले की, ‘ज्यांच्या आजोबांचा सावरकांशी परिचय होता, त्या नातवाने सावरकरांवर पुस्तक लिहिलं ते निरगुडकर कुठं आणि दुसरीकडे ज्यांच्या आजोबांनी सावकरांचा अपमान केला म्हणून मणिशंकर अय्यर यांना जोडे हाणले, ते आदित्य ठाकरे कुठं’. त्यामुळेच मला निरगुडकर श्रेष्ठ वाटतात. निरगुडकरांनी घेतलेल्या भूमिकेचा व्यक्तीच्या माध्यमातून परिचय करून द्यायचा असेल, तर त्यांनी महाभारतातल्या संजयची भूमिका पार पाडली आहे, असं मी म्हणेल. पण आजकाल संजय हा शब्द शिवीसारखा वाटतो. मी सर्वच संजय बद्दल बोलत नाही. सकाळी साडेनऊ वाजता येणाऱ्या संजय बद्दल बोलतोय, अशी खोचक टीक आशिष शेलार यांनी केली.

हेही वाचा – “अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या…”, ठाकरे गटाचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र; ‘त्या’ फोटोवरून लगावला टोला!

दरम्यान, सकाळच्या पत्रकार परिषदेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल संजय राऊतांना टोला लगावला. गुरुवारी माध्यमांशी बोलताना, राजकारणातील कटुता संपवायची असेल तर संजय राऊतांनी सकाळचे अभंग बंद करायला हवे, तरच राज्यातील राज्यातील राजकीय वातावरण शुद्ध होईल, असे ते म्हणाले होते.