आशीष शेलार राष्ट्रवादीकडून लक्ष्य; शहराध्यक्षांनी आरोप फेटाळले
महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजले आणि राजकीय नेत्यांची आरोपबाजी सुरू झाली. सुधार समितीचे अध्यक्षपद कायम भाजपकडे राहिले असून, मुंबईतील अनेक भूखंडांची आरक्षणे समितीने बदलली आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार हे यामागचे सूत्रधार असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तर राष्ट्रवादीच्या या उलटय़ा बोंबा असल्याचा प्रत्यारोप भाजपने केला.
मुंबई महापालिकेच्या गैरव्यवहारांवरून भाजपचे नेते सातत्याने ओरड करतात, पण याच भाजपच्या ताब्यात वर्षांनुवर्षे असलेल्या सुधार समितीने सुमारे दोन लाख कोटींच्या भूखंडांचे आरक्षण बदलून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. शेलार यांच्या मतदारसंघातील मोक्याच्या ठिकाणचा जनतेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील आरक्षण बदलण्यात आले. सुधार समितीचे अध्यक्षपद भाजपच्या अन्य कोणाकडेही असले तरी समितीचा कारभार त्यांच्याच कलाने चालत होता. यामुळे पारदर्शक कारभाराची शेलार यांची भाषा हास्यास्पद असल्याची टीकाही मलिक यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करून बेजार करून सोडले होते. आता याच पद्धतीने भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्याची खेळी राष्ट्रवादीने आखली आहे. भाजपवर हल्ला चढविल्याने त्याचा शिवसेनेलाही फायदा होणार आहे.
‘पारदर्शी कारभारासाठी आग्रही’
वांद्रे परिसरातील भूखंडावरील आरक्षण बदलण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाला होता. त्याची माहिती उघड करणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा असल्याचे प्रत्युत्तर आशीष शेलार यांनी दिले आहे. मलिक यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. पारदर्शी कारभाराकरिता भाजप आग्रही असून, भाजपकडे असलेल्या सुधार किंवा शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी कुठेही गैरव्यवहार केलेला नाही, असा दावाही शेलार यांनी केला.