कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली होती. तसेच कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा परिणामही दिसून आला, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता”, वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवाराचं स्पष्टीकरण; म्हणाले, “अजितदादा स्वतःच…”

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sharad Pawar on Uddhav and devendra fadnavis
उद्धव ठाकरेंची शाहांवर टीका, फडणवीसांबाबत अवाक्षर नाही, नव्या मैत्रीचे संकेत? शरद पवार म्हणाले…
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”

नेमकं काय म्हणाले आशीष शेलार?

“घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का?” अशी प्रतिक्रिया आशीष शेलार यांनी दिली.

“राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्त्व देत नाही”

पुढे बोलताना, “राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देत असून त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्त्व देत नाही,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी”, मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर अंधारेंचा टोला; म्हणाल्या…

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, आज अंबरनाथमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. या वेळी बोलताना कर्नाटकमधील भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव दिसला असून “जनतेला, लोकांना कधीही गृहीत धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा,” असंही राज ठाकरे म्हणाले. याबरोबरच कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Story img Loader