खासदार राहुल शेवाळे यांची उचलबांगडी
स्वागताध्यक्षपदासाठी निवड केल्यानंतर अपेक्षित आर्थिक मदतीच्या दृष्टीने योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबईत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या ‘स्वागताध्यक्ष’पदावरून खासदार राहुल शेवाळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. ‘कोमसाप’ संमेलन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ‘कोमसाप’च्या सूत्रांकडून देण्यात आली. स्वागताध्यक्षपदासाठी आता आमदार आणि ‘भाजप’च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अॅड्. आशीष शेलार यांना साकडे घालण्यात आले असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
‘आर्थिक मदत द्या, स्वागताध्यक्ष व्हा’ – ‘अपेक्षित आर्थिक मदत मिळाली नाही तर ‘स्वागताध्यक्ष’ बदलणार’ अशी बातमी ‘लोकसत्ता’ने ३१ ऑक्टोबरच्या ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये दिली होती. ‘कोमासाप’चे १६ वे साहित्य संमेलन २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मुंबईत दादर येथे होणार आहे. या संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून खासदार राहुल शेवाळे यांची निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित आर्थिक मदत किंवा निधी न मिळाल्याने शेवाळे यांना बदलावे का? अशी चर्चा ‘कोमसाप’मध्ये सुरू झाली होती. त्यानुसार सोमवारी झालेल्या बैठकीत शेवाळे यांना बदलून नव्या स्वागताध्यक्षाची निवड करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा