नवी जबाबदारी बाळासाहेब थोरातांवर?

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी पक्षनेतृत्वाला केली आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे समजते.  त्याबाबत अजून  घोषणा झालेली नाही. थोरात यांनी त्याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Revenue Secretary Sanjay Malhotra to be the new RBI Governor for a period of 3 years!
RBI Governer : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, पुढील तीन वर्षे असेल कार्यकाळ
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण

चव्हाण यांच्यावर २०१५ मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. लोकसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघटनेत फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू  असून, त्या पाश्र्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

या संदर्भात चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्याच दिवशी आपण पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर  पक्षनेतृत्वाकडे राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत राहुल गांधी यांच्यासमवेत राज्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यावेळीही  प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती केली. राहुल गांधी यांचीही स्वतंत्र भेट घेऊन त्यांना पुन्हा तशीच विनंती केल्याची माहिती चव्हाण यांनी लोकसत्ताला दिली. पक्षनेतृत्वाने अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Story img Loader