मॅजेस्टिक बुक डेपो आणि लोकमान्य सेवा संघ (श्री. वा. फाटक ग्रंथ संग्रहालय)यांच्या संयुक्त विद्यमाने विलेपार्ले येथे १० जानेवारीपासून मॅजेस्टिक गप्पा सुरू होत असून त्या १९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. गप्पांचे यंदा ३१ वे वर्ष आहे. या गप्पा दररोज रात्री साडेसात वाजता विलेपार्ले (पूर्व) येथील लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणात होणार आहेत. गप्पांची सांगता संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे.
कार्यक्रम आणि मान्यवरांचा सहभाग
११ जानेवारी : कलादिग्दर्शक शशांक टेरे यांची प्रकट मुलाखत.
१२ जानेवारी : अभिनेता स्वप्नील जोशी याची प्रकट मुलाखत.
१३ जानेवारी : ‘अंतरिक्षाची ओढ’ या विषयावर परिसंवाद. सहभाग-डॉ. बाळ फोंडके, मोहन आपटे, अरविंद परांजपे, श्रीराम शिधये.
१४ जानेवारी : न्युरोस्पायनल जनरल डॉ. पी. एस. रामाणी यांची प्रकट मुलखत. १५ जानेवारी : ‘भ्रष्टाचार निर्मूलन किती शक्य आणि किती अशक्य’ या विषयावर परिसंवाद. सहभाग-हुसेन दलवाई, अतुल भातखळकर, संजीव साने, हेमंत देसाई, प्रकाश अकोलकर.
१६ जानेवारी : स्त्रियांच्या नजरेतून पुरुष’ या विषयावर परिसंवाद. सहभाग- नीलम गोऱ्हे, अभिनेत्री स्मिता तळवलकर, कवयित्री नीरजा, संजीव लाटकर. १७ जानेवारी : ‘खरेच आपण आधुनिक आहोत का?’ या विषयावर परिसंवाद. सहभाग-श्याम मानव, मंगला आठलेकर, मिलिंद भागवत.
१८ जानेवारी : उद्योजक मिलिंद कांबळे यांची प्रकट मुलाखत.
‘मॅजेस्टिक गप्पा’ उद्यापासून सुरू
मॅजेस्टिक बुक डेपो आणि लोकमान्य सेवा संघ (श्री. वा. फाटक ग्रंथ संग्रहालय)यांच्या संयुक्त विद्यमाने विलेपार्ले येथे १० जानेवारीपासून मॅजेस्टिक गप्पा सुरू होत असून त्या १९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत.
आणखी वाचा
First published on: 09-01-2014 at 02:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok patki in majestic talk