मुंबई: कमी वजनाच्या तसेच जन्मतः जीविताला धोका असणाऱ्या नवजात बालकांमध्ये मृत्यदराचे प्रमाण कमी करण्यासाठी दुग्धदानाचे योगदान अतिशय मोलाचे ठरत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रयत्नांमुळे मागील पाच वर्षांमध्ये १० हजारांहून अधिक नवजात बालकांना दुग्धदानाचा मोलाचा फायदा झाला आहे. सन २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत ४३ हजार ४१२ मातांनी स्वेच्छेने दुग्धदानाचे मोलाचे कर्तव्य समाजासाठी बजावले आहे. या रुग्णालयातील मातृ दुग्ध बँकेमुळे अनेक नवजात बालकांना जन्मानंतर मातृ दूध मिळवून देणे शक्य तर झाले आहेच, त्याही पुढे जाऊन आता या रुग्णालयाची मातृ दुग्ध बँक ही पश्चिम भारतात नव्याने होऊ घातलेल्या मातृ दुग्ध बॅंकांच्या उभारणीसाठी देखील सहकार्य करत आहे.

नवजात बालकांना जन्मानंतर सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण असे मातृ दूध पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय रुग्णालयामध्ये मातृ दुग्ध बँकेच्या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यासोबतच अधिकाधिक स्वच्छतेची काळजी घेण्यास महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आदर्श घेऊन अधिकाधिक राज्यांना तसेच महाराष्ट्रातील इतर रुग्णालयांना मातृ दुग्ध बँक निर्मितीसाठी मदत करण्याचे महत्वाचे कार्यदेखील यानिमित्ताने करण्यात येत असल्याची माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना

हेही वाचा – नि:क्षारीकरण प्रकल्पाची निविदा प्रक्रिया वादात

जन्मतः पुरेशी वाढ न झालेल्या तसेच कमी वजनाच्या बालकांना या रुग्णालयात नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (निओनॅटल इन्टेसिव्ह केअर युनिट) मातृ दुग्ध बँकेच्या माध्यमातून दुधाचा पुरवठा करण्यात येतो. रुग्णालयात दरवर्षी सरासरी १० हजार ते १२ हजार इतक्या बालकांचा जन्म होतो. त्यापैकी १५०० ते दोन हजार इतक्या प्रमाणात नवजात बालकांना या मातृ दुग्ध बँकेच्या माध्यमातून दुधाचा पुरवठा करण्यात येतो.

गत पाच वर्षांमध्ये एकूण ५१ हजार २१४ मातांचे दुग्धदानासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी ४३ हजार ४१२ मातांनी दुग्धदान केले. या दुग्धदानातून सुमारे ४ हजार १८४ लीटर दूध जमा झाले. कमी वजनाच्या तसेच पुरेशी वाढ न झालेल्या एकूण १० हजार ५२३ नवजात बालकांना या मातृ दुधाचा पुरवठा करण्यात आला. ज्या मुलांचे वजन जन्मतःच कमी असते त्यांना अथवा पुरेशी वाढ न झालेल्या बालकांना या दुधाचा पुरवठा करण्यात येतो. तसेच प्रसुतीनंतरच्या गुंतागुंतीमुळे बाळाला दूध न पाजू शकणार्‍या तसेच कमी दूध असणाऱ्या मातांच्या बाळाला हे दूध पाजण्यात येते.

हेही वाचा – काँग्रेसला सर्वाधिक जागांची अपेक्षा, प्रचाराची सुरुवात २० ऑगस्टपासून ; जागावाटपात कच न खाण्याची नेत्यांची भूमिका

मातृ दुग्ध बँकेसाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय हे पश्चिम भारतासाठी विभागीय सल्लागार केंद्र (झोनल रेफरन्स सेंटर) म्हणून २०१९ पासून कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शासकीय तसेच खासगी रुग्णालयाच्या ठिकाणी मातृ दुग्ध बँक निर्माण करण्यासाठी विविध सल्ला आणि पर्यवेक्षकाच्या स्वरुपातील कार्य केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. या केंद्राशी संलग्न राज्यांमध्ये गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दमण आणि दिव तसेच महाराष्ट्रातील रुग्णालये संलग्न आहेत. या केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि परिचारिकांसाठी प्रशिक्षणाचे नियमितपणे आयोजन केले जाते.