मुंबई : विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय २८८ आमदारांपैकी ६५ टक्के आमदारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल असून त्यातही ११८ म्हणजेच ४१ टक्के आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्हयांची नोंद असल्याची बाब समोर आली आहे.

आमदारांमध्ये २२ महिला असून वयोमानानुसार सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (७७ वर्षे), दिलीप सोपल (७५ वर्षे) आणि गणेश नाईक (७४ वर्षे) यांचा क्रम लागतो. तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) रोहित पाटील (२५ वर्षे) सर्वात तरुण आमदार असून त्यांच्यानंतर अनुक्रमे भाजपचे करण देवतळे (२९ वर्षे), राघवेंद्र पाटील (३१ वर्षे) आणि शिवसेना (ठाकरे) वरुण देसाई (३२ वर्षे) यांचा क्रमांक लागतो.

kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

हेही वाचा >>>राज्यभरात पशूगणना सुरू, जाणून घ्या पशूगणनेची वैशिष्ट्ये

निवडणुकीच्या निकालावर ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् ’( एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचच्या ताज्या अहवालानुसार निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी (त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशीलानुसार) ६५ टक्के (१८७) उमेदवारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. त्यातही ११८(४१ टक्के) उमेदवारांविरोधात बलात्कार, महिलांवर अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न, भ्रष्टाचार, निवडणुकीशी सबंधित असे गंभीर स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत.

भाजपच्या १३२ पैकी ९२ (७० टक्के)आमदारांवर विविध गुन्हे दाखल असून त्यातही ४० टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

शिवसेना (शिंदे) ५७ आमदारांपैकी ३८ आमदारांवर(६७ टक्के) गुन्हे दाखल असून त्यातही ४७ टक्के आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राष्ट्रवादीच्या(अजित पवार) ४१ पैकी २० (४९टक्के) आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.

तर शिवसेना(ठाकरे) २० पैकी १३, काँग्रेसच्या ९ आणि शरद पवारांच्या पक्षातील पाच आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >>>मुंबई : महानगरपालिकेतील लिपिक पदाची परीक्षा पुढील आठवड्यात, २ ते ६ आणि ११ ते १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणार

साजिद पठाण सर्वात गरीब

अजित पवारांच्या पक्षाचे १०० टक्के आमदार करोडपती असून भाजप, शिवसेनेचे ९८ टक्के आमदार करोडपती आहेत. काँग्रेसचे साजिद पठाण सर्वात गरीब आमदार असून त्यांची एकूण मालमत्ता फक्त ९ लाखांची आहे. भाजपचे शाम खोडे आणि गोपीचंद पडळकर यांची मालमत्ता अनुक्रमे ३१ लाख आणि ६५ लाख रुपये आहे.

Story img Loader