मुंबई : मुंबईत यंदा कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून एकही संवेदनशील मतदान केंद्र नसले तरी तब्बल ७६ मतदान केंद्रे ही क्रिटीकल (दखलपात्र) स्वरुपाची आहेत. या मतदान केंद्रावर १० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान नोंदवले गेले आहे. अशी शहर भागात १३, तर उपनगरात ६३ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सर्वाधिक ९ मतदान केंद्रे ही कुलाब्यातील नेव्हीनगर परिसरात आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Elections: मुंबईत तीन लाख नवीन मतदार, मतदानाचा टक्का वाढणार का याबाबत उत्सुकता

Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Delhi assembly elections 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा

मुंबईतील ७३ क्रिटीकल मतदान केंद्रे असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मतदान केंद्रावर १० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान होत असल्यास किंवा एखाद्या मतदान केंद्रावर एकाच उमेदवाराला ९० टक्क्यापेक्षा अधिक मतदान होत असल्यास ते मतदान केंद्र क्रिटीकल समजले जाते. याकरीता सहा विविध निकष आहेत. मात्र मुंबईत १० टक्क्यांपेक्षा कमी मतदान या एकाच निकषानुसार तब्बल ७६ मतदान केंद्रे ही क्रिटिकल असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीनिमित्त एसटीच्या नऊ हजार बस धावणार

कुलाब्यातील नऊ क्रिटीकल मतदान केंद्रांपैकी बहुतांशी नौदलाच्या परिसरात आहेत. तसेच मुंबईच्या अन्य भागातील क्रिटीकल मतदान केंद्रांमध्येही नौदल किवा सैन्याच्या अखत्यारितील मतदान केंद्रांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे या परिसरात अनेकदा नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेले नागरिक जास्त असतात. अनेक मतदार जहाजावर एक दोन महिन्यांच्या कालावधीकरीता गेलेले असतात. तर काही वेळा नौदलाच्या किंवा सैन्याच्या अखत्यारितील वसाहतींमध्ये निवडणूक निरीक्षकांना सुरक्षेच्या कारणास्तव सोडले जात नाही. अशा काही कारणांमुळे या परिसरात मतदान अतिशय कमी होत असल्याचे आढळून आले आहे.

कुठे, किती मतदान केंद्रे क्रिटीकल

कुलाबा – ९

वांद्रे पूर्व – ९

चांदिवली – ७

दहिसर – ७

बोरिवली – ६

मागाठाणे – ५

विलेपार्ले – ६

घाटकोपर पश्चिम – ५

मानखुर्द शिवाजी नगर – ५

Story img Loader