मुंबई: गोरगरीब व गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मदत करण्याकरीता स्थापन करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाने गेल्या नऊ महिन्यांमध्ये तब्बल १३ कोटी २५ लाख रुपयांची मदत केली आहे.

उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जानेवारी – सप्टेंबर २०२४ दरम्यान ४१८ रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली. हृदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो प्रत्यारोपण, फुफ्फुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुनर्स्थापना शस्त्रक्रिया यांसारख्या गंभीर व सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या मदत कक्षाकडून मदत करण्यात आलेल्या ४१८ रुग्णांना ९ महिन्यांत १३ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. गोरगरीब रुग्णांनी या मदत कक्षाकडून धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक धर्मादाय रुग्णालयातील एकूण खाटांच्या १० टक्के खाटा या गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी आणि १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक आहे.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

हेही वाचा >>>मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; वांद्रे- कुर्ला संकुल, शिवाजी नगरमधील हवा ‘खराब’

२४ तास मदतीसाठी हेल्पलाईन

उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाशी नागरिकांबरोबर संपर्क साधता यावा यासाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी १८०० १२३ २२११ या क्रमांकावर संपर्क साधाव. तसेच मदतीसाठी अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo@maharashtra. gov.in या ई-मेल आयडीवर मेल करू शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे

धर्मादाय रूग्णालयातील खाटा मिळण्यासाठी रूग्णाचा किंवा नातेवाईकांचा अर्ज, लोकप्रतिनीधींचे पत्र, आधार कार्ड किंवा ओळखपत्र, रेशनकार्ड किंवा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक आहे.

हेही वाचा >>>आमची दैना पोलिसांची व्यथा; अनिश्चित कर्तव्याच्या कालावधीचा मुद्दा ऐरणीवर…

वार्षिक उत्पन्न मर्यादा

गरीब रूग्णासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख ८० हजारपर्यंत असून अशा रूग्णांवर धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. तसेच वार्षिक उत्पन्न एक लाख ८० हजार रुपये ते तीन लाख ६० हजार रुपयांदरम्यान असलेल्या गरीब रुग्णांवर ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतात.

धर्मादाय रुग्णालयात १२ हजार खाटा राखीव

धर्मादाय आयुक्तालयाअंतर्गत राज्यातील सुमारे ४६८ रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे १२ हजार खाटा गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव आहेत. यामध्ये मुंबईतील कोकीळाबेन, एन. एन. रिलायन्स, पुण्यातील सह्याद्री रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय इत्यादी नामांकित रुग्णालयांचा समावेश आहे.