ठाणे शहराच्या गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवरील कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना अंमली पदार्थांची तस्करी करताना रंगेहात पकडले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे यांना बडतर्फ केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Video: “हा व्हिडीओ पाहा, उद्धव ठाकरेंच्याही पायात बूट…”, भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर; ‘तो’ व्हिडीओ केला शेअर!

ठाणे शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात महेश वसेकर आणि रवी विशे यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब) (२) व कलम २९ अन्वये १६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख किंमतीचे ९२१ ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. ठाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत अंमली पदार्थ विक्रीसाठी या दोघांनी काही जणांसोबत संभाषण व व्यवहार केल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी दोघांना बडतर्फ केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assistant police sub inspector and constable of railway police force dismissed in drug smuggling case mumbai print news dpj