हाजी अलीजवळ भरधाव वेगात दोन गाडय़ांना धडकलेली महागडी अ‍ॅस्टन मार्टिन मोटारगाडी रिलायन्स इंडस्ट्रिजच्या मालकीची असल्याचे उघड झाले आहे. मात्र या गाडीच्या चालकाला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
रविवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास हाजी अली परिसरात अ‍ॅस्टन मार्टिन गाडीने ऑडी आणि ह्य़ुंदाई गाडीला धडक दिली. ऑडीमधून महिला उद्योजक फोरम रुपल, तर ह्य़ुंदाईमधून ठाणे येथील विक्रम मिश्रा प्रवास करीत होते. अपघात होताच अ‍ॅस्टन मार्टिनचा चालकाने गाडी तेथेच सोडून धूम ठोकली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस रवाना झाले. अ‍ॅस्टन मार्टिन ही महागडी गाडी रिलायन्स पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच या चालकाचे नावही पोलिसांना समजले आहे. मात्र अद्यापही त्याला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aston martin belonging to reliance port rams two vehicles police