पुढील म्हणजेच २०१३ साली राजकीय क्षेत्रात काय उलथा पालथ होणार, अरिवद केजरीवाल कोणते धमाके करणार, कतरिना कैफ व सलमान खान व सचिन तेंडुलकरचे काय होणार आणि  जन्मतारखेनुसार आपल्यापैकी प्रत्येकाचे भविष्य काय आहे, तळपायावरील रेषां काय सांगतात अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणारा ‘लोकप्रभा’चा भविष्य विशेषांक प्रकाशित झाला आहे.
टॅरो कार्ड रीडिंग म्हणजे नेमके काय, भविष्य वर्तविण्याच्या जगभरातील पद्धती कशा विकसित झाल्या या विषयांचाही या विशेषांकात समावेश आहे. सूर्य राशीतील अंक व जन्मतारीख यांचा संबध ज्येष्ठ संख्याशास्त्र तज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी उलगडून दाखविला आहे आणि २०१३ सालचे प्रत्येक राशीचे भविष्यही मांडले आहे. प्रसिद्ध ज्योतिषी आनंद जोहरी यांनी २०१३ साली देशात काय घडामोडी होणार याचा वेध घेतला आहे तळहातावरील रेषाप्रमाणेच तळपायाच्या रेषांनुसार भविष्य कसे सांगतात याची मांडणी अश्विन रेळे यांनी केली आहे. टॅरो कार्डच्या आधारे  महत्वाचे निर्णय कसे घेऊ शकतो याचा उहापोह जागृती मेहता यांनी केला आहे. जगाच्या काना कोप-यातील भविष्य वर्तविण्याच्या पद्धतीचा धांडोळा शुभांगना अत्रे यांनी घेतला आहे. हा अंक १० रुपयांना सर्वत्र उपलब्ध आहे.

Story img Loader