मुंबई: देशामध्ये कर्करोग ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण देशातील विविध कर्करोगाच्या रुग्णालयांमध्ये साधारणपणे १४०० रेडिओथेरपी केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात भारतामध्ये फक्त ७०० रेडिओथेरपी केंद्रे आहेत. त्यामुळे तूर्तास कर्करोगाच्या रुग्णांना घराजवळ उपचार अशक्य आहे, असे इंडियन कॅन्सर कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज गुप्ता यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्करोग रुग्णांवर कमीत कमी कालावधीत आणि स्वस्त उपचार व्हावेत यासाठी अनेक संशोधक व डॉक्टर प्रयत्नशील आहेत. यापूर्वीच्या रेडिएशन उपचार पद्धतीमध्ये रुग्णांना सलग सात ते आठ आठवडे रेडिएशन घ्यावे लागत होते. मात्र आता हा कालावधी अवघ्या एका आठवड्यावर आला आहे. नव्या तंत्रज्ञानामध्ये ज्या ठिकाणी कर्करोगामुळे पेशी खराब झाल्या आहेत, त्या पेशीच नष्ट केल्या जातात. या उपचार पद्धतीमुळे कर्करोगावरील उपचार सुलभ झाले असले तरी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही रेडिओथेरपी यंत्रणा अद्यापही उपलब्ध करणे शक्य झालेले नाही. जागतिक आरेाग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विकसनशील व कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रुग्णांना त्यांच्या घराजवळ कर्करोगावरील उपचार मिळावेत यासाठी १० लाख नागरिकांमागे एक रेडिओथेरपीचे यंत्र असणे आवश्यक आहे. त्यानुसार भारतामध्ये तब्बल १४०० रेडिओथेरपी यंत्रे असणे गरजेचे आहे.

हेही वाचा… ३७ हजार गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती पूर्ण; दीड लाखांपैकी ६६ हजारांहून अधिक कामगारांनी जमा केली कागदपत्रे

मात्र सध्या देशामध्ये निम्मी म्हणजे ७०० रेडिओथेरपी यंत्रे आहेत. यातील २०० हून जास्त रेडिओथेरपी यंत्रे सरकारी रुग्णालयात आहेत. रेडिओथेरपी उपचार महागडे असल्याने देशातील सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. देशातील ६५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जातात. त्यातुलनेत रेडिओथेरपी यंत्रे नसल्याने रुग्णांची प्रतीक्षायादी वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये सरकारी रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांना किमान चार ते पाच तास प्रवास करावा लागतो. त्यामुळे सध्या तरी देशामध्ये रुग्णांना घराजवळ कर्करोगावरील उपचार उपलब्ध करणे अशक्य असल्याचे इंडियन कॅन्सर कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज गुप्ता यांनी सांगितले. कर्करोग रुग्णांना त्यांच्या घराजवळ उपचार उपलब्ध करण्याठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची तसेच त्या महाविद्यालयांमध्ये रेडिओथेरपी यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At present it is impossible for cancer patients to receive treatment near their homes said manoj gupta president of the indian cancer congress mumbai print news dvr
Show comments