Atal Setu Suicide 2nd Incident in 3 days : मुंबईतील एका मोठ्या बँकेतील उपव्यवस्थापक सुशांत चक्रवर्ती (४०) यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून समुद्रात उडी मारली. त्यांचा मृतदेह मंगळवारी नवी मुंबीतील जेएनपीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. मृतदेहाची ओळख पटली असून नवी मुंबई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून हे प्रकरण शिवडी पोलिसांकडे वर्ग केलं आहे. दरम्यान, बुधवारी पुन्हा एकदा अटल सेतूवर अशीच एक घटना घडली आहे. मुबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून समुद्रात उडी घेत एका ५२ वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. तीन दिवसांतली ही दुसरी घटना आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती देताना सांगितलं की, बुधवारी सकाळी अटल सेतूवरून उडी मारून व्यावसायिक फिलीप शाह यांनी आत्महत्या केली आहे. माटुंगा येथील रहिवासी असलेल्या शाह हे त्यांची सेडान कार घेऊन अटल सेतूवर गेले होते. त्यांनी त्यांची कार रस्त्याच्या बाजूला लावली आणि समुद्रात उडी घेत आत्महत्या केली.

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Kashmiri Girl Suicide
Kashmiri Girl Suicide : बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
sucide pod controversy
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?
death of a boy, Pimpri, case registered doctors,
पिंपरी : चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरसह दोन परिचारिकांवर गुन्हा

हे ही वाचा >> ग्रॅन्ट रोड येथे इमारतीचे छत कोसळले, मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता

आत्महत्येचं कारण काय?

पोलिसांनी सांगितलं की पूलावरील सीसीटीव्ही निंयत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी एक कार उभी असलेली पाहिली. त्यानंतर त्यांनी बचाव पथकाशी संपर्क साधला. निंयत्रण कक्षातील कर्मचारी व बचाव पथक कारजवळ पोहोचलं. जिथून शाह यांनी समुद्रात उडी घेतली त्याच भागात शोधमोहिम हाती घेण्यात आली. बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी देखील समुद्रात उडी घेत शोध सुरू केला. तसेच एक बोट देखील समुद्रात नेण्यात आली. काही तासांच्या शोधमोहिमेनंतर बचाव पथकाने शाह यांना समुद्रातून बाहेर काढलं आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी सांगितलं बऱ्याच वेळापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे.

शाह यांच्याकडील आधार कार्डद्वारे त्यांची ओळख पटली. पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणाचा प्राथमिक तपास करून सांगितलं की शाह हे गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात होते. यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. दरम्यान, नवी मुंबईतील न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> वरळी अपघातप्रकरणी लवकरच प्रत्यक्षदर्शीची साक्ष, दोन दिवसांत ७०० पानांचे आरोपपत्र

बँक मॅनेजरची अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्या

दोन दिवसांपूर्वी एका बँकेतील उपव्यवस्थापक सुशांत चक्रवर्ती (४०) यांनी अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्या केली होती. सुशांत चक्रवर्ती यांनी अटल सेतवरून उडी मारल्याची माहिती शिवडी पोलिसांना मिळाली. शिवडी पोलिसांनी तपासणी केली असता अटल सेतूवरून समुद्रात उडी मारणाऱ्या व्यक्तीची लाल रंगाची मोटारगाडी (ब्रेजा) घटनास्थळी आढळली. ही मोटरगाडी सुशांत चक्रवर्ती यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चक्रवर्ती परळ येथे पत्नी व मुलीबरोबर वास्तव्यास होते व फोर्ट परिसरातील हुतात्मा चौक येथील बँकेत उपव्यवस्थापक पदावर कार्यरत होते. पोलिसांनी तात्काळ चक्रवर्ती यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावले आणि पतीबाबत माहिती घेतली. गेल्या काही दिवसांपासून चक्रवर्ती कामाच्या तणावाखाली होते, असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. चक्रवर्ती पत्नी व मुलीला शनिवारी लोणावळा येथे घेऊन गेले होते. तेथून परत आल्यानंतर सोमवारी सकाळी कामाला जात असल्याचे सांगून चक्रवर्ती घरातून बाहेर पडले. पण ते बँकेत न जाता शिवडी पोलिसांच्या हद्दीतील अटलसेतूवर गेले आणि त्यांनी तेथून समुद्रात उडी मारली.