रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राजकीय लाभासाठी इंदू मिल परिसरातील आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी प्रतिकात्मक भूमिपूजन करू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तो पोलीस हाताळतील, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
इंदू मिल येथे जागा ताब्यात मिळाल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक सर्वानी मिळून उभारले पाहिजे. त्यासाठी आराखडा निश्चित करणे व अन्य बाबींना काही कालावधी लागणार आहे. राजकीय लाभ उठविण्यासाठी अकारण घाई करू नये. स्मारक हा राजकारण करण्याचा विषय नाही, असे पाटील म्हणाले.दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन करणार असून तेथे आणि इंदू मिलच्या प्रस्तावित स्मारकाच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. राज्यमंत्री सचिन अहीर यांच्या पुढाकाराने सायंकाळी अभिवादन सभेचे आयोजनही शिवाजी पार्क परिसरात करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा