मुंबई : भिवंडीतून अनधिकृतपणे चालणाऱ्या टेलिफोन एक्स्चेंजवर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई केली आहे. या कारवाईत ९ सिम बॉक्स, विविध कंपन्यांचे २४६ सिम कार्ड, ८ वायफाय राउटर सिमबॉक्स चालविण्याकरीता वापरण्यात येणारे १९१ अँटीनासह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंज चालविणाऱ्या जाफर बाबूउस्मान पटेल (४०) याला एटीएसने अटक केली आहे.

बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालवले जात असल्याची माहिती ३१ जुलै रोजी एटीएसला मिळाली. त्या गोपनीय माहितीच्या आधारे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी भिवंडीतील नवीन गौरीपाडा आणि रोशनबाग या ठिकाणी छापा टाकून अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा शोध घेतला. कारवाई दरम्यान दिनस्टार कंपनीचे ९ सिम बॉक्स, विविध कंपन्यांचे २४६ सिम कार्ड, विविध कंपन्यांचे ८ वायफाय राउटर, सिमबॉक्स चालविण्याकरीता वापरण्यात येणारे १९१ अँटीना आणि सीमबॉक्स कायम कार्यान्वित रहावा यासाठी वापरण्यात येणारे इनव्हर्टर असा अंदाजे एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Ulhasnagar Circle 4 police solved 180 crimes returning 65 lakh rupees to complainants
६५ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना हस्तांतरीत उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांची कामगिरी, १८० गुन्ह्यांची उकल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Contract to supply manpower to Vitthal Rukmini Temple Committee cancelled
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मनुष्यबळ पुरवठा करणारा ठेका रद्द; तक्रारींनंतर मंदिर समितीकडून कारवाई
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Mumbai targeted by cyber thugs after gang war terrorist attacks print exp
गँगवॉर, दहशतवादी हल्ल्यांनंतर मुंबई सायबरठगांचे टार्गेट… गतवर्षी १२०० कोटींची सायबर फसवणूक! केवळ १० टक्के रिकव्हरी! 
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
Scottish hiker detained in New Delhi over use of Garmin inReach
तुमच्याकडे ‘हे’ जीपीएस आढळल्यास होऊ शकते अटक; यावर भारतात बंदी का? स्कॉटिश महिलेला का झाली अटक?

हेही वाचा – मुंबई : पोलीस ठाण्यातून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न, पायाला दुखापत

हेही वाचा – मुंबई : महागड्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक

दीड वर्षापासून अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सुरू होते. त्यामुळे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तेथून आखाती देशात दूरध्वनी करण्यात आले आहेत. याप्रकरणी एटीएसने पटेल याला ताब्यात घेत चौकशीनंतर अटक केली. तो त्याच्या साथीदारांच्या मदतीने अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंज चालवत होता. दहशतवाद विरोधी पथकाने त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) सह भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ मधील कलम ४, सह द टेलिकम्युनिकेशन अ‍ॅक्ट २०२३ चे कलम ४२ तसेच इंडियन वायरलेस टेलीग्राफी अ‍ॅक्ट १९३३ कलम ३ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader