मुंबई : बांगलादेशी घुसखोरांना भारतीय आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून देणाऱ्या आरोपींना अटक करण्यात दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) यश आले. याप्रकरणी आतापर्यंत तीन बांगलादेशी नागरिकांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हाताच्या बोटांचे कृत्रिम ठसे तयार करून त्याद्वारे विविध कागदपत्रे बनवल्याचा संशय आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अटक आरोपींपैकी मेहंदी हसन नन्हेमिया सिद्धीकी ऊर्फ राजू (५२) व रामचंद्र साबाजी धुरी (५८) हे दोघेही बांगलादेश घुसखोरांंना आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून देण्यात मदत करीत होते. याशिवाय खुशबू तिवारी या महिलेलाही एटीएसने ठाण्यातून अटक केली आहे. आरोपी खूशबूच्या हाताचे कृत्रिम ठसे आरोपींनी बनवले असून त्याचा वापर बनावट कागदपत्रे बनवण्यात होत असल्याचा संशय आहे.

एटीएसने नुकतीच याप्रकरणी ठाण्यातील जांभळी नाका येथून समीर शब्बीर मोहीम याला अटक केली. याशिवाय याप्रकरणी मोहम्मद इनायत मुल्ला, मोहम्मद नूरइस्लाम शेख व मोहम्मद नूर इस्लाम शेख या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ats arrested accused for forging aadhaar and pan cards for bangladeshi infiltrators mumbai print news sud 02