१३ जुलैच्या बॉम्बस्फोटातील फरारी आरोपींबाबत महाराष्ट्र ‘एटीएस’ने प्रसिद्ध केलेले वकासचे छायाचित्र चुकीचे असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केल्यामुळे पुन्हा खळबळ माजली आहे. याबाबत एटीएसमधील सूत्रांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात नकार दिल्यामुळे हे छायाचित्र खरे आहे की खोटे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
१३ जुलैच्या बॉम्बस्फोटातील फरारी आरोपींमध्ये यासिनसह झिया उर रेहमान ऊर्फ वकास इब्राहिम साद ऊर्फ वकास याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. या आरोपींना पकडणाऱ्यांना दहा लाखांचे बक्षिसही जाहीर करण्यात आले होते. यासिनपाठोपाठ वकास जेरबंद झाला असला तरी एटीएसने प्रसिद्ध केलेले छायाचित्र वकासचे नसल्यामुळे तो कसा सापडला असता, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हे छायाचित्र वकासचे नसल्याचे असादुल्लाह यानेच दिल्ली पोलिसांना सांगितल्याचे कळते. त्यामुळे वकास बिनधास्तपणे वांद्रे येथील एका लॉजमध्ये काही दिवस राहून अजमेरला रवाना झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तबरेजमुळे वकास पकडला गेला असला तरी वकासच्या खोटय़ा छायाचित्रामुळेच तो बिनधास्तपणे मुंबईत राहू शकला, असे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा