अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) मुंबईतील कार्यालयावर शनिवारी काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. माटुंगा रेल्वे स्थानकासमोरच ‘अभाविप’चे हे कार्यालय आहे. या हल्ल्यात कार्यालयातील सामानाची नासधुस करण्यात आली असून ‘अभाविप’च्या काही कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली. यामध्ये फ्रान्सिस डिसोझा या कार्यकर्त्याच्या डोक्याला मार लागला असून त्याच्यावर सध्या सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ‘अभाविप’च्या पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्यामागे नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि काँग्रेसचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
‘अभाविप’च्या मुंबईतील कार्यालयावर अज्ञातांचा हल्ला
माटुंगा रेल्वे स्थानकासमोरच 'अभाविप'चे हे कार्यालय आहे
Written by लोकसत्ता टीम
First published on: 23-01-2016 at 18:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on abvp office in mumbai