अंधेरीतील फिल्मालय स्टुडियोमध्ये शनिवारी रात्री काही अज्ञातांनी तोडफोड  करण्याची घटना घडली आहे. फिल्मालय स्टुडियोमध्ये राज कुंद्रा यांच्या ‘सुपर फाईट लीग’चे शूटिंग सुरू असताना ही तोडफोड करण्यात आली.
शूटिंग दरम्यान काही लोकांनी जबरदस्ती स्टुडिओत शिरण्याचा प्रयत्न केला.  आता शिरण्यास त्यांना विरोध करताच त्यांनी सिक्यूरिटी केबीनची तोडफोड करायला सुरूवात केली. या लोकांनी तेथील महिला रिसेप्शनिस्टचा विनयभंगही केल्याचे वृत्त आहे. या लोकांनी आपण मनसे कार्यकर्ते आहोत असे सांगून राज कुंद्राकडून पैशाचीही मागणी केली.
यासंबंधी राज कुंद्रा यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.

Story img Loader