शनिवारी दिवसभर नवनीत राणा आणि रवी राणा यांचं मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान, त्यानंतर घेतलेली मघार आणि मग त्यांना करण्यात आलेली अटक या नाट्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मध्यरात्री देखील मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा घडल्याचं पाहायला मिळालं. अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशनबाहेर दगडफेक झाली. या हल्ल्यात किरीट सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम देखील झाली. या प्रकारानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मध्यरात्री हा सगळा प्रकार घडल्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”

दगडफेकीनंतर किरीट सोमय्यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे. “मला वाटतं मुंबई पोलीस आणि उद्धव ठाकरेंच्या संगनमताने हा हल्ला झाला आहे. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हा तिसरा प्रयत्न झाला आहे. पहिला वाशिम, दुसरा पुणे आणि नंतर खार. आश्चर्याची बाब म्हणजे माझी एफआयआर पोलीस घेत नाहीत. पण माझ्या नावाने एक बोगस एफआयआर पोलिसांनी स्वत:च रजिस्टर केली. त्यात लिहिलं की कुठूनतरी एकच दगड आला होता”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

नेमकं काय घडलं?

किरीट सोमय्यांनी काय घडलं यासंदर्भात सांगताना ७० ते ८० जणांचा जमाव होता असं म्हटलं आहे. ” ७०-८० शिवसेना कार्यकर्त्यांचं घोळकं, दगडफेक, खार पोलिसांच्या उपस्थितीत जीवे मारण्याचा प्रयत्न. हा विषय आम्ही अर्धवट सोडणार नाही. त्या सगळ्या गुंडांवर कारवाईचा आग्रह करण्यासाठी भाजपाचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आहे”, असं सोमय्या म्हणाले.

“घोटाळ्यांच्या अंतापर्यंत लढत राहणार”

“ठाकरे सरकारला जर असं वाटेल की धमक्या देऊन, जीवघेणा हल्ला करून ते त्यांच्या घोटाळेबाजांना वाचवू शकतील तर ते मूर्खांच्या स्वर्गात आहेत. ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांच्या घोटाळ्यांच्या अंतापर्यंत किरीट सोमय्या संघर्ष करत राहणार”, असं देखील सोमय्या यावेळी म्हणाले.

“दगडफेक झाली हे खरं आहे, ती…”, सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया!

“पोलिसांनी मला जमावात सोडून दिलं”

दरम्यान, पोलिसांनीच आपल्याला जमावामध्ये सोडून दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. “हे मुंबई पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी मला त्यांच्यामध्ये झोकून दिलं. नंतर संजय पांडेनं वांद्रे पोलिसांवर दबाव आणून किरीट सोमय्याच्या नावाने बोगस एफआयआर नोंदवला. त्यात एकच दगड आला होता असं म्हणतात. संजय पांडेंना देखील धडा शिकवावा लागणार”, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला.

शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या जखमी: “मी सरकाला इशारा देतोय की…”; गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगत फडणवीसांचा संताप

मध्यरात्रीचा हाय व्होल्टेज ड्रामा!

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी आजच्या नाट्यमय घडामोडीनंतर ताब्यात घेतलं. मात्र यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकामध्ये पोहोचले. एक ते दीड तास सोमय्या पोलीस स्थानकामध्ये होते. त्यानंतर पोलीस स्थानकामधून बाहेर पडताना पोलीस स्थानकाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकल्या. या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली.