एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर चाकूहल्ला झाल्याची घटना चेंबूर येथे घडली. दुर्देवाची गोष्ट अशी की या हल्ल्यात तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. चेंबूरच्या सुमन नगर येथील अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ ही घटना घडली. तरुणी कामावर जात असताना एका तरुणाने मागून येऊन तरुणीवर चाकूचे वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. गंभीर अवस्थेत तरुणीला नजिकच्या सुराणा-सेठीआ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घडलेल्या प्रकरणाचा चुनाभट्टी पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader