काँग्रेस नगरसेवर शिवा शेट्टी यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी गोराई येथे हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी शिवराम पाटील आणि त्यांच्या दोन मुलांना अटक केली आहे. शेट्टी हे गोराईच्या प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक आहे. गोराईच्या सायली महाविद्यालयात विद्यार्थ्यांची भांडणे सुरू होती. ती सोडविण्यासाठी शेट्टी गेले होते. त्यावेळी ४ च्या सुमारास शिवराम पाटील यांनी शेट्टी यांच्यावर बांबूने हल्ला केला. या भागात शिवराम पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. त्याची तक्रार केल्यामुळे सूडापोटी मारहाण करण्यात आल्याची शेटट्ी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान शिवराम पाटील यांनी या प्रकरणात आपला संबंध नसून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
आणखी वाचा