मीरा रोड येथील एका बारवर टाकण्यात आलेल्या छाप्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत. तर हल्ल्याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात देऊन घरी परतणाऱ्या अन्य एका पत्रकारावरही झालेल्या हल्ल्यात त्या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. राघवेंद्र दुबे असे मृत पत्रकाराचे नाव असून शशी शर्मा व संतोष मिश्रा हे जखमी झाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मीरा रोड येथील एका बारवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्याचे वृत्तांकन करण्यासाठी संतोष मिश्रा, शशी शर्मा हे गेले होते. यावेळी हा हल्ला करण्यात आला होता.

Story img Loader