मुंबईः धारावी येथे घरगुती वादातून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याचा आणि त्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत दोघेही गंभीर भाजले असून त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी धारावी पोलीसांनी हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धारावी येथील नाईक नगर येथील अशोक गल्लीत हा प्रकार घडला. तेथील खोली क्रमांक ४१५ मध्ये प्रिया धुरिया (२६) व अनिल धुरिया (२६) दाम्पत्य राहत होते. बुधवारी दोघांमध्येही भांडण झाले. त्यावेळी अनिल नशेत होता. त्याने घरातील रॉकेल प्रियाच्या अंगावर ओतले व तिला पेटवले. त्यानंतर त्याने स्ततःच्या अंगावरही पेट्रोल ओतून घेतले व आग लावली. या घटनेत दोघेही गंभीर भाजले असून त्यांना तात्काळ शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी धारावी पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल करून अनिलविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत प्रिया १०० टक्के, तर अनिल ९० टक्के भाजल्याचे पोलिसांनी सांगितले.

Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Two bike riders die three injured in two separate accidents in Pune city
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, तिघे जखमी
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
atul subhash suicide chaturang article
समजून घ्यायला हवं
Why was petition of Seclink company rejected in Dharavi redevelopment case is way clear for Adani group
धारावी पुनर्विकास प्रकरणी ‘सेकलिंक’ कंपनीची याचिका का फेटाळली? अदानी समूहाचा मार्ग मोकळा?
Story img Loader