भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती’ असं कॅप्शन देत सामनामधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक बातमी पोस्ट केली आहे. यात सामनाच्या पहिल्या पानावर बाळासाहेब ठाकरे आणि समोर मोठा जनसमुदाय असा फोटो आहे. तसेच त्या बातमीचं शीर्षक “निश्चयाचा महामेरू कसले, पवार तर सोनियांचे पायधरू” असं आहे.

विशेष म्हणजे याआधी देखील भाजपाने अनेकदा बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत शरद पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढवला आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केल्यानंतर भाजपाने अनेकदा शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “घरी बसण्याचा निकष लावला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात मोठे आहेत. त्यांची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. कुंभकर्ण सुध्दा सहा महिन्यांनी जागा व्हायचा हे कुणी तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगण्याची गरज आहे.”

हेही वाचा : “…त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको” ; अतुल भातखळकरांनी साधला अमोल कोल्हेंवर निशाणा !

दरम्यान, याआधी अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत म्हटलं होतं, “ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो” म्हणजे टीकाकारांचे टक्कल करणे, डोळा फोडणे, खटला भरणे हेच ना? झेपत असेल तर थोडं काम करून दाखवा.”

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेसंबंधी भाष्य केलं होतं. “मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत असून या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला होता.

Story img Loader