मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक रवींद्र कदम, सहायक आयुक्त शशिकांत सुर्वे, नागेश लोहार यांना यंदाची उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदके तर राज्यातील ४५ पोलिसांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
विक्रीकर विभागाचे दक्षता अधिकारी आणि महानिरीक्षक विनय कारगावकर, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. छेरिंग दोरजे, उपायुक्त संजय जांभूळकर, अमरावती येथील राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडंट जानकीराम डाखोरे यांच्यासह मुंबईतील पोलीस निरीक्षक सतीश क्षीरसागर, सहायक निरीक्षक वसंत सारंग (नागपाडा) तसेच उपनिरीक्षक विष्णू बढे (मुंबई), हनुमंत सुगावकर (पुणे), सखाराम रेडकर (गुन्हे विभाग, मुंबई), राजन मांजरेकर (वाहतूक शाखा, मुंबई), एकनाथ केसरकर (टिळकनगर), बाळासाहेब देसाई (कुर्ला), चंद्रकांत पवार (बोरिवली), हेड कॉन्स्टेबल प्रदीप कवाडकर तसेच एटीएसचे अशोक रोकडे आदींना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. अन्य पदकप्राप्त पोलिसांची नावे पुढीलप्रमाणे : पोलीस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद), रशीद तडवी (धुळे), सुभाष दगडखैर, श्रीमती सुरेखा दुग्गे (राज्य गुप्तचर विभाग), सहायक निरीक्षक शामकांत पाटील (औरंगाबाद), राजेंद्र झेंडे (गुप्तचर विभाग, जळगाव), राजेंद्र होटे (अमरावती), भास्कर वानखेडे (नागपूर), सहायक उपनिरीक्षक लियाकतअली मोहम्मदअली खान (भंडारा), सुभाष रनावरे (पुणे), दिलीप भगत (उस्मानाबाद), शामवेल उजागरे (दौंड), अरुण बुधकर (पिंपरी), अरुण पाटील (बॉम्बशोधक पथक, जळगाव), मोतीलाल पाटील (ठाणे), भारतरीनाथ सोनावणे (पुणे), मधुकर भागवत, हिंमत जाधव (दोंड), राजेंद्र पोथरे (पुणे), हेड कॉन्स्टेबल प्रकाश ब्रम्हा, संभाजी पाटील (पुणे), विठ्ठल पाटील (सांगली), तुकाराम बांगर (ठाणे).

Story img Loader