मतदारयादीत नावच नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागण्याची वेळ अभिनेता अतुल कुलकर्णी आणि एचडीएफसी बॅंकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांच्यावर आली. अतुल कुलकर्णी आपल्या पत्नीसह मतदान करण्यासाठी गुरुवारी सकाळी गोरेगाव येथील मतदान केंद्रावर पोहोचला. मात्र, त्याचे आणि त्याच्या पत्नीचे नावच मतदार यादीत नसल्यामुळे त्याला मतदान करता आले नाही.
गेली १२ वर्षे मी याच पत्त्यावर राहतोय आणि यापूर्वी चार वेळा इथूनच मतदानाचा हक्कही बजावला आहे. मात्र, यावेळी मतदार यादीतून नावच गायब झाल्यामुळे अतुल कुलकर्णी याने तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी याद्यांमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
अभिनेत्री वंदना गु्प्ते यांचेही नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर दरवर्षी त्या मतदान करतात. मात्र, यावेळी तेथील यादीत त्यांचे नावच नसल्याचे त्यांना दिसले. मतदान करता न आल्यामुळे त्यांनीही नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा