Audi Ola Accident drivers Fight : मुंबईतील पार्कसाइट पोलिसांनी २४ वर्षीय ओला चालकाला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपरमधील रहिवासी बिभाष चक्रवर्ती आणि त्याची पत्नी अंतरा घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की एका मारुती अर्टिगा कारने ऑडी कारला हलकी धडक दिली. ज्यामध्ये ऑडीला किरकोळ स्क्रॅच आलेले असू शकतात. मात्र या धडकेनंतर ऑडी कारमधील तरुण बिभाष कारमधून उतरला. त्याने मागे जाऊन ओला कारचालकाशी वाद सुरू केला. त्यानंतर बिभाषने ओला कारचालकाच्या कानशिलात लगावली आणि त्याला उचलून जमिनीवर आपटलं.

ही घटना १९ ऑगस्टची आहे. मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. बिभाषने ओला कारचालकाला जबर मारहाणही केली. या मारहाणीत कारचालक कयामुद्दीन कुरैशी जखमी झाला आहे. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात कुरैशीवर उपचार केले जात आहेत. घटनेच्या दोन दिवसांनंतर बुधवारी २१ ऑगस्ट रोजी कुरैशी शुद्धीवर आला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. याप्रकरणी पोलिसांनी बिभाष चक्रवर्ती याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसतंय की बिभाषने कयामुद्दीन मोइनुद्दीन कुरैशी याच्या कानशिलात लगावली, नंतर त्याला उचलून जमिनीवर आपटलं. बिभाषने कयामुद्दीनला उचलून आपटल्यानंतर कयामुद्दीन बराच वेळ जमिनीवर निपचित पडला होता. त्यानंतर त्याला इतर लोकांनी रुग्णालयात दाखल केलं.

accident in Goregaon, two-wheeler accident Goregaon,
गोरेगावमध्ये दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Four police suspended, Khar, detaining person Khar,
खारमध्ये एका व्यक्तीला बेकायदेशिररित्या ताब्यात घेतल्याप्रकरणी चार पोलीस निलंबित
Goregaon Mulund Expressway project,
गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचा खर्च अडीचशे कोटींनी वाढला
Mumbai cockroach coffee, case against hotel manager,
मुंबई : कॉफीमध्ये झुरळ सापडल्याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा
Self defense class, ITI, Maharashtra,
राज्यातील ‘आयटीआय’मध्ये आत्मसंरक्षणाचा वर्ग भरणार, राज्यातील महिलांसाठी ‘हर घर दुर्गा अभियान’
Youth cheated, Youth cheated by fake officer,
मुंबई : तोतया अधिकाऱ्याकडून तरुणाची फसवणूक
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

हे ही वाचा >> याला म्हणतात माणुसकी! गावकऱ्यांनी साखळी करून वाचवला बकऱ्यांचा जीव, पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले; पाहा Viral Video

नेमकं काय घडलं?

सीसीटीव्ही व्हिडीओत दिसतंय की पांढऱ्या रंगाची ऑडी पुढे जातेय व एक राखाडी रंगाची मारुती अर्टिगा ऑडीच्या मागून येत आहे. त्याचवेळी ऑडीचालकाने ब्रेक मारून कार थांबवली. मात्र मागून येणाऱ्या अर्टिगाचा चालक त्याची कार लगेच थांबवू शकला नाही. अर्टिगाने ऑडीला हलकी धडक दिली. त्यानंतर ऑडीमध्ये बसलेला बिभाष कारमधून उतरला आणि अर्टिगाच्या दिशेने चालू लागला. तोवर कयामुद्दीन देखील अर्टिगामधून उतरला कयामुद्दीन काहीतरी बोलणार येवढ्यात बिभाषने त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्याने कयामुद्दीनला उचलून जमिनीवर आपटलं.

हे ही वाचा >> बापरे! रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या महिलेचा निष्काळजीपणा नडला; आरपीएफ जवान ठरला देवदूत, VIDEO सोशल मीडियावर चर्चेत

घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बिभाषने ओला चालक कयामुद्दीनला जमिनीवर आपटल्यानंतर कयामुद्दीन बेशुद्ध पडला. त्यावेळी बिभाष व त्याची पत्नी बाजूलाच उभे होते. दोघे काहीतरी बोलताना दिसत आहेत. दरम्यान, व्हायरल व्हिडीओ आणि कयामुद्दीनने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बिभाष व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.