लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : थकीत भाड्याबाबत एक तक्रार आली, तरी संबंधित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे लेखापरीक्षण (ॲाडिट) केले जाणार आहे. यासाठी शासकीय नामतालिकेवरील प्रमाणित लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेखापरीक्षकांचा अहवाल आल्यानंतर संबंधित झोपु योजनेवर कारवाई केली जाणार आहे. झोपडीवासीयांना झोपडी तोडल्यानंतर भाडे वितरित करण्याची जबाबदारी असतानाही संबंधित विकासकांकडून पाळली जात नसल्यामुळे आता प्राधिकरणानेच अशा भाडे थकबाकीदार योजनांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

Deep investigation into bogus crop insurance Devendra Fadnavis assures Nagpur news
बोगस पीक विम्याची सखोल चौकशी; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nitin Gadkari , Lok Sabha Election, Violation Petition ,
नितीन गडकरींना उच्च न्यायालयाकडून नोटीस, खासदारकी रद्द करण्याची याचिकेद्वारे मागणी
bjp mla sudhir mungantiwar
लोकजागर : मुनगंटीवार कुणाचे ‘बळी’?
Chief Minister Devendra Fadnavis asserts that there should be a time-bound evaluation of the performance of ministers print politics news
मंत्र्यांच्या कामगिरीचे कालबद्ध मूल्यमापन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांमध्ये
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना

याशिवाय थकीत भाड्याच्या वसुलीसाठी प्राधिकरणाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे आता विकासकांना झोपडीवासीयांचे भाडे थकवणे मुश्किल बनले आहे. तरीही काही विकासक भाडे देण्यास विलंब लावत आहेत. याबाबत एखादी तक्रार जरी आली, तरी संबंधित योजनेतील भाडे थकबाकीचा आढावा घ्यावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

आणखी वाचा-घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!

झोपडीवासीयांच्या भाड्यासंदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्राधिकरणाने स्वतंत्र भाडे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. भाड्यासंदर्भातील तक्रार झोपडीवासीयाला थेट ॲानलाईन करता येते. ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी प्राधिकरणाने मदत केंद्र सुरू केले आहे. तक्रार आल्यानंतर प्राधिकरणाकडून प्रत्येक तक्रारीनुसार सुनावणी घेतली जात होती. परंतु, अशी सुनावणी घेण्याऐवजी संबंधित झोपु योजेनेचे लेखापरीक्षण केल्यावर थकीत भाड्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर संबंधित विकासकाविरुद्ध कारवाई करणे अधिक सोपे होईल. त्यासाठी ही पद्धत सुरू करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-गोखलेपुलाची तुळई खाली आणण्याचे काम अखेर पूर्ण, कामाला उशीर झाल्यामुळे कंत्राटदाराला दंड होणार

तब्बल ६०० कोटींची भाडेवसुली

झोपु प्राधिकरणाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, झोपडीधारकांना दोन वर्षांचे आगावू भाडे आणि त्यापुढील वर्षभराच्या भाड्याचे धनादेश देणे विकासकांना बंधनकारक आहे. या अटीची पूर्तता केल्याशिवाय नव्या योजनेत इरादापत्र दिले जात नाही. याशिवाय कुठल्याही नव्या योजनेला परवानगी दिली जात नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार, झोपडीवासीयांचे भाडे विकासकांनी प्राधिकरणाकडे जमा करावयाचे आहे. त्यानंतर प्राधिकरणाकडून भाडे वितरित केले जात आहे. या प्रक्रियेत वेळ लागत असल्यामुळे विकासकांनी वेळेवर भाडे जमा करूनही प्रत्यक्ष झोपडीवासीयांना उशिराने भाडे मिळत आहे. मात्र, अशा तक्रारी आता कमी झाल्या असून तब्बल ६०० कोटींची भाडेवसुली झाल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला.

Story img Loader