कधी कुतुहल म्हणून, कधी गंमत म्हणून ज्योतिषाकडे वळणाऱ्यांचे कुतूहल चाळवणारा, ‘उद्या’बद्दलची उत्सुकता वाढवणारा साप्ताहिक ‘लोकप्रभा’चा ज्योतिष विशेषांक प्रसिद्ध झाला असून त्यात नामवंत ज्योतिषी आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचे लेख आहेत.
संख्याशास्त्र म्हणजेच न्यूमरॉलॉजीच्या आधाराने भविष्य सांगणे हा एक लोकप्रिय प्रकार. उल्हास गुप्ते यांनी तिचा आधार घेत प्रत्येक राशीचे संपूर्ण वर्षांचे महिन्यानुसार सविस्तर भविष्य दिले आहे. त्यानुसार जन्मतारखेनुसार वर्षभरात आपल्या आयुष्यात काय काय घडू शकते याचा अंदाज गुप्ते यांनी व्यक्त केला आहे. दाते पंचांग परिवारातील विनय श्रीधर दाते यांनी ज्योतिषशास्त्र आणि कालगणना यांच्यातील संबंध उलगडून दाखवला आहे. जागृती मेहता यांनी ज्योतिषाच्या संदर्भात टॅरो कार्डाचे महत्त्व विशद केले आहे.
विजय जकातदार यांनी करियरच्या संदर्भात कुंडली काय सांगत असते, आणि तिचा अर्थ कसा लावायचा असतो हे स्पष्ट केले आहे तर सुनील डोंगरे यांनी ज्यातिष म्हणजे काय आणि विविध रंग आपल्या व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम करत असतात, त्यांचा ज्योतिषशास्त्राशी काय संबंध असतो याची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा