औरंगजेबाला इतिहासकारांनी हिंदू द्वेष्टा असं ठरवलं आहे. पण तो हिंदू द्वेष्टा नव्हता. त्याच्या दोन बायकांना काशीच्या पंड्यांनी भ्रष्ट केलं. त्यामुळे त्याने काशीचं मंदिर फोडलं. पुस्तकं, ग्रंथ वाचले की हे समजतं. आता नव्या पिढीने ज्ञान मिळवून इतिहास समजून घेतला पाहिजे असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच पेशवे हे अत्यंत नीच आणि दुष्ट होते असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवरायांचाही एकेरी उल्लेख केला आहे.

औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता

“औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नसायचा. हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या. तुम्हाला माहित आहे शाहजानची आई हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या आल्याच नाहीत परत. छावणीतले लोक म्हणाले की माहित नाही. मग औरंगजेबाला हे समजलं की तिथले जे पंडे होते ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. असे पंडे असतील तर त्यांना मारलंच पाहिजे, या विचाराने त्याने काशी विश्वेवर मंदिर फोडलं. त्यानंतर इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता. पंडे हे काही हिंदू होते का? बायकांना भ्रष्ट करणारे? पुस्तकं वाचूनच हे कळतं. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालायात तुम्ही आलात पुस्तकं वाचलीत की तुम्हाला खरं काय ते कळेल.” असं नेमाडेंनी म्हटलं आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हे पण वाचा- “पेशवे हे दुष्ट आणि नीच प्रवृत्तीचे होते, कुठेही गेले..”, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य

छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख

“सगळ्या जुन्या गोष्टी इथेच कळतात. शिवाजीचा विश्वासू सहकारी मुसलमान होता. शिवाजीच्या बरोबर शेवटपर्यंत त्याचा विश्वास असणारा सहकारी मदारी मेहेतर होता. स्वतःच्या लोकांपेक्षा शिवाजीचा जास्त विश्वा मदारी मेहेतरवर होता. औरंगजेबाचा सेनापती जयसिंग ज्याने शिवाजीला पकडून दिलं तो हिंदू होता. औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. निम्म्याहून जास्त हिंदू सरदार त्याच्या काळात वाढले आहेत मग तो हिंदू द्वेष्टा वगैरे होता कसं म्हणता येईल? सतीची चाल पहिल्यांदा बंद करणारा औरंगजेब होता. इतिहासात बेटिंगचं नाव असतं. पहिल्यांदा सतीची चाल औरंगजेबाने बंद केली होती.”

औंधच्या पंतप्रतिनिधींविषयी काय म्हणाले नेमाडे?

“औंधचे पंतप्रतिनिधी होते, त्यांच्या घरात आठ वर्षांच्या मुलीचं लग्न ४२ वर्षांच्या माणसाशी लावून दिलं. तिला जे सहन करावं लागलं त्यामुळे तिने आडात (विहिरीत) जीव दिला. २० व्या शतकाच्या सुरुवातीचं चित्र आहे. आपणही वाचतोय, रोज बातम्या येत आहेत बायकांना भ्रष्ट केल्याच्या. पिंपरीत ३०० मुलींना पळवून नेलं जातं, धंद्याला बसवलं जातं. कशाला राहायचं या देशात? आपण निर्लज्जपणे राहतो आहोत. आता नव्या पिढीने बदललं पाहिजे. आमची पिढी संपली आता नव्या पिढीने हे बदल घडवले पाहिजेत” असं भालचंद्र नेमाडेंनी म्हटलं आहे.

Story img Loader