मुंबई : बोरीवली येथे १७ वर्षांच्या मुलीला पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या ४५ वर्षीय रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली. पीडित मुलीने आरोपीच्या रिक्षाचे छायाचित्र काढून पोलिसांना दिले. त्या आधारे पोलिसांनी एका दिवसांत आरोपीला अटक केली. याप्रकरणी बोरीवली पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपक शिंदे असे अटक आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी उत्तर उपनगरात राहते. ती रविवारी सायंकाळी बोरिवली पश्चिम येथे मैत्रिणीच्या घरी जात असताना रस्त्यावर एक रिक्षा उभी होती. त्यावेळी रिक्षाचालक तिच्याकडे पाहून अश्लील कृत्य करू लागला. पीडित मुलगी घाबरली. पण तिने प्रसंगावधान दाखवून आरोपीच्या रिक्षाचे छायाचित्र काढले. त्यानंतर तिने बोरीवली पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. तसेच आरोपीच्या रिक्षाचे छायाचित्र पोलिसांना दिले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.