मुंबईः गोरेगाव येथे शिकवणीसाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

१४ वर्षांची पीडित मुलगी सोमवारी रिक्षाने शिकवणीला जात होती. त्यावेळी ३२ वर्षीय आरोपी रिक्षाचालकाने पीडित मुलीकडे तिचा मोबाइल क्रमांक मागितला. तिने नकार दिल्यानंतर रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. तिने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यांनी याप्रकरणी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला राहत्या परिसरातून अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षाचालक सध्या पोलीस कोठडीत आहे.

Story img Loader