मुंबई : मुंबईपासून अवघ्या तास-दीड तास अंतरावर असलेल्या अलिबाग, घारापुरी या पर्यटनस्थळी जलमार्गे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र गेट वे ऑफ इंडियालगतच्या समुद्रातील स्पीड बोटींचा स्वैरसंचार, अतिधाडस प्रवासी बोटींसाठी धोकादायक ठरू लागले आहे. मच्छीमारांची जाळीही समुद्राच्या प्रवाहासह बोटीच्या पंख्यात अडकून दुर्घटनेची शक्यता वाढू लागली आहे. परिणामी, अलिबाग आणि घारापुरीसाठी सुरक्षित जलमार्ग निश्चित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेली काही वर्षे अलिबाग आणि लगतच्या स्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. अलिबागच्या रस्ते प्रवासासाठी साडेतीन ते चार तासांचा अवधी लागतो. मात्र ‘गेट वे ऑफ इंडिया’वरून सोडण्यात येणाऱ्या प्रवासी बोटींतून तास-दीड तासात अलिबाग गाठता येते. तसेच गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला बोटीतून जाता येते. त्यामुळे शनिवार आणि रविवारी जलमार्गे अलिबाग आणि घारापुरीला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. तसेच नोकरी-व्यवसायासाठी समुद्रमार्गे मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ही मंडळी प्रवासी बोटींमधून नियमित प्रवास करतात.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !

हेही वाचा…बेस्टच्या दुर्दशेवर तोडगा काढण्यासाठी कामगार संघटनेचे आता मुख्यमंत्र्यांना साकडे

‘गेट वे ऑफ इंडिया’-अलिबाग दरम्यान मालदार कॅटामरीन, पीएनपी मेरिटाईम सव्र्हीसेस, अजंता या कंपन्यांची, तर गेट वे ऑफ इंडिया- घारापुरी दरम्यान गेट वे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्था आणि ‘महेश टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स’ची प्रवासी बोट सेवा कार्यान्वित आहे. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळी, नाताळची सुट्टी आणि आठवडाअखेरीस अलिबाग आणि घारापुरीला मोठ्या संख्येने पर्यटक जातात. दरम्यान, गेल्या काही वर्षे गेट वे ऑफ इंडिया येथून खासगी स्पीड बोट सेवा सुरू झाली असून अतिवेगाने धावणाऱ्या स्पीड बोटी अलिबाग, घारापुरीला जाणाऱ्या प्रवासी बोटींसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. स्पीड बोट चालक अनेकदा धोकादायक कसरती केल्या जातात. त्यांचा वेग, मार्ग यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. काही वेळा स्पीड बोटी प्रवासी बोटींच्या अगदी जवळून जातात. त्यावेळी प्रवासी बोटींना अडथळा निर्माण होतो. अनेकदा प्रवासी बोटींतील प्रवासीही धास्तावतात, असे एका प्रवासी बोटीच्या चालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले.

हेही वाचा…सेंट जॉर्जमधील डॉक्टरांनी घडवून आणली मायलेकरांची भेट, १४ वर्षांच्या तरुणचे वडील मात्र बेपत्ताच

जाळीचा अडथळा नेहमीचाच

मच्छीमार मंडळी समुद्रात मासेमारीसाठी जाळे पसरवून ठेवतात. काही वेळा पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाळे बोटींच्या मार्गात येते. मासेमारीचे जाळे बोटीच्या पंख्यात अडकते आणि बोट चालवणे अवघड बनते. अखेर बोटीच्या पंख्यात अडकलेले जाळे काढून पुढे मार्गस्थ व्हावे लागते. मात्र अशा वेळी प्रवाशांची धाकधूक वाढते. जलप्रवासातील हे वाढते धोके लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सदर प्रवासी बोट चालकाने केली.

Story img Loader