सांताक्रूझ विमानतळावर वाढणारी विमान वाहतूक आणि नवी मुंबई येथील प्रस्तावित विमानतळाच्या उभारणीला होत असलेला विलंब यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालय जुहू येथील जुन्या विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्याबाबत आढावा घेत असल्याचे विमान वाहतूकमंत्री अजित सिंह यांनी सांगितले.
१९२८ मध्ये उभारण्यात आलेल्या मुंबईतला पहिला विमानतळ असलेला जुहू विमानतळ सध्या छोटी विमाने आणि हेलिकॉप्टर्सच्या उड्डाणासाठी वापरला जातो. पुढील दोन वर्षांंमध्ये सांताक्रूझ येथील हवाई वाहतूक प्रचंड वाढणार असून त्यासाठी तो विमानतळ अपुरा पडणार असल्याचे सांगून अजित सिंह म्हणाले की, २०१५-१६ मध्ये सुरू होणाऱ्या नवी मुंबई विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशा स्थितीमध्ये व्यापारी आणि आर्थिक राजधानीचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी मुंबईतील जुहू विमानतळाचा पुनर्वापर होणे आवश्यक आहे. या विमानतळाची मुख्य धावपट्टी समुद्रामध्ये भर घालून वाढवून तेथे मोठी विमाने उतरविण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा