उमाकांत देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : मुंबई पोलीस दलासाठी बाह्य यंत्रणेद्वारे तीन हजार पोलिस शिपायांच्या किंवा सुरक्षारक्षकांच्या जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी नियुक्त्या करण्याच्या प्रस्तावाला अर्थ खात्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. गृहखात्याने हा प्रस्ताव मंजूर करुन महिना उलटला असला तरी अर्थखात्याकडून निधी देण्यास मंजुरी न दिल्याने हे पोलिस अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.
मुंबई पोलीस दलात सुमारे दहा हजार पदे रिक्त असून ७०७६ पोलीस शिपाई आणि ९९४ वाहनचालक पदे भरण्यासाठी २१ जानेवारी २०२१ रोजी मंजुरी देण्यात आली होती. तरीही सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत. नियमित भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण पूर्ण करुन पोलिस शिपाई सेवेत दाखल होण्यासाठी एक-दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून नियमित भरतीद्वारे पोलीस शिपाई उपलब्ध होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त ११ महिन्यांच्या कालावधीसाठी तीन हजार पोलीस शिपाई घेण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव मुंबई पोलीस आयुक्तांनी राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यांना केवळ बंदोबस्त आणि सुरक्षाविषयक (स्टॅटिक डय़ूटी) जबाबदारी देण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले होते.
पोलीस दलात बाह्य यंत्रणेद्वारे पोलीस शिपाई भरतीचा प्रस्ताव पहिल्यांदाच सादर झाला होता. त्यास गृह खात्याने २४ जुलै २०२३ रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर या निर्णयावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आवाज उठविल्यावर पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार नाही, या नियुक्त्या नियमित पोलीस शिपाई प्रशिक्षण पूर्ण करुन उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणार आहेत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले होते.
सुरक्षा महामंडळाकडून ४५ दिवस आणि वेगवेगळय़ा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. तर नियमित पोलिस भरतीत निवड झालेल्यांना सुमारे ११ महिन्यांचे प्रशिक्षण पोलिस अकादमीत पूर्ण करावे लागते. सुरक्षा महामंडळाकडे प्रशिक्षण पूर्ण केलेले सुमारे बारा हजार सुरक्षारक्षक उपलब्ध असून त्यापैकी आठ-साडेआठ हजार सुरक्षारक्षकांच्या विविध आस्थापनांमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महामंडळाकडे चार-साडेचार हजार सुरक्षा रक्षक उपलब्ध असून त्यापैकी तीन हजार सुरक्षारक्षक मुंबई पोलिसांना देण्यात येणार आहेत. त्यांच्या वेतनासाठीची अग्रीम रक्कम म्हणून सुमारे ३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
सुरक्षा महामंडळाच्या कार्यपध्दतीनुसार तीन महिन्यांच्या वेतनाची रक्कम जमा झाल्यावर सुरक्षारक्षक किंवा शिपाई पुरविले जातात. मुंबई पोलिस दलासाठी ते उपलब्ध करुन देण्याची आवश्यक प्रक्रिया सुरु आहे. – बिपीनकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक तथा महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक