कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंचातर्फे देण्यात येणाऱ्या कॉ. दत्ता देशमुख स्मृती पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन, कॉ. भाई वैद्य आणि सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंचतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. शिधावाटप यंत्रणेतील प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे सुरेश सावंत, सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन आणि कॉ. भाई वैद्य यांना यंदाचा कॉ. दत्ता देशमुख स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता ठाणे येथील वसंतराव नाईक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.   

Story img Loader