मुंबई : सफाई कामगारांसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिका मुख्यालयाबाहेर काढलेल्या मोर्चाप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह १६ पदाधिकारी व ६० ते ७० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला. कोणतीही परवानगी न घेता मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>> केदार शिंदे यांचा ‘आईपण भारी देवा’ लवकरच येणार, जागतिक महिला दिनानिमित्ताने घोषणा
मुंबईतील विशेष झोपडपट्टीतील स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धत अवलंबली जात आहे. कंत्राटी पद्धतीमुळे रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने १२०० कोटी रुपयांच्या निविदा रद्द कराव्या आणि ही कामे महिला बचत गट, बेरोजगार संस्थांना द्यावी या मागणीसाठी सफाई कामगार संघटनांनी बुधवारी पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), आप, कम्युनिस्ट पक्ष यासह इंडिया आघाडीतील मित्र पक्षही या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिका मुख्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालिका मुख्यालय आणि समोरील रस्ते रस्ता रोधक (बॅरिकेड्स) उभारून बंद करण्यात आले होते. हे रस्ता रोधक पाडून आंदोलकांनी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मुख्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले. पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह प्रकाश रेड्डी व इतर १५ पदाधिकारी, तसेच ६० ते ७० आंदोलकांविरोधात आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परवानगी न घेता मोर्चा काढणे व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई दुरुस्ती मंडळातील रिक्त पदांचा रहिवाशांना फटका!
रास्ता रोको प्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा
युवक काँग्रेसतर्फे मंत्रालय येथे बुधवारी रास्ता रोको करण्यात आला होता. त्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व १७ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. इलेक्ट्रॉल बाण्ड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली यादी एसबीआयने अद्याप न दिल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे बुधवारी मंत्रालयाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. या सर्वांना नोटीस देऊन सोडण्यात आले.