शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती सुधारत असल्याचे काल (गुरूवार) रात्री उध्दव ठाकरे याच्यातर्फे सांगण्यात आले असले तरी आजही (शुक्रवार) मातोश्रीवर दिग्गजांची रीघ चालूच आहे. आज सकाळी योगगुरू रामदेव बाबा आणि अभिनेते सुरेश व विवेक ओबेरॉय यांनी “मातोश्री’वर बाळासाहेबांची भेट घेतली. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनीही बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. पुणे स्थित प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या कुटुंबीयांनतर्फेही बाळासाहेबांसाठी प्रार्थना करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आज (शुक्रवार) सकाळी बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. आज सकाळी लीलावती रूग्णालयाचे डॉ. जलील परकार आणि त्यांची टीम मातोश्रीवर दाखल झाली होती. मात्र, साधारण आर्धातासानंतर माध्यमांशी काहीही न बोलताच ते स्रवजण निघून गेले.
बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा “मातोश्री’समोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. काल विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर वर्णी लावली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा