मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने लॉरेन्स बिश्नोई टोळीतील आकाशदीप कारजसिंह गिल (२२) याला पंजाबमधून अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पंजाब पोलिसांच्या मदतीने भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या एका गावात ही अटक कारवाई केली. गिल याच्यावर हत्येत सहभागी आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील ही २४वी अटक आहे.

वांद्रे पूर्वेकडील खेरनगर परिसरात १२ ऑक्टोबरच्या रात्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने एकूण २३ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. मूळचा पंजाबमधील फाजिल्का, पक्का चिस्ती गावातील रहिवासी असलेल्या आकाशदीप याला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटाची माहिती होती. हत्येच्या कटात तो सहभागी होता, असा पोलिसांचा आरोप आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान

हेही वाचा : आमच्या भविष्यासाठी अमितकाका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, मनसे पदाधिकाऱ्याच्या कन्येचे प्रचारादरम्यान अमित ठाकरेंना पत्र

अन्य अटक आरोपींच्या चौकशीत आणि गुन्ह्याच्या तपासात आकाशदीप याचे नाव उघड झाले. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाबमध्ये दाखल होऊन पंजाब पोलिसांच्या गुंडविरोधी कृती दलाच्या मदतीने आकाशदीप याला जेरबंद केले. अटकेनंतर आकाशदीप याला पंजाबमधील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथील न्यायालयाने त्याला मुंबईत आणता यावे यासाठी तीन दिवसांची ट्रान्झिट कोठडी सुनावली होती. आकाशदीप याला मुंबईत आणण्यात आले असून त्याला रविवारी मुंबईतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader