Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असून आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मूळचा राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी असल्याची माहिती सांगितली जात आहे. या आरोपीने १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. भगवंत सिंग (३२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव असून तो नवी मुंबईत राहत होता. भगवंत सिंग याच्या अटकेनंतर कोठडीत असलेल्या एकूण आरोपींची संख्या १० वर पोहोचली आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान

हेही वाचा : “मी अजून जिवंत आहे”, झिशान सिद्दिकींचा वडिलांच्या मारेकऱ्यांना इशारा; म्हणाले, “तुम्ही त्यांना मारलंत, पण…”

भगवंत सिंग या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भगवंत सिंगने आरोपींना पुरवलेले शस्त्र कोठून आणले होते? त्याने ते शस्त्रे कसे पुरवले? तो राजस्थानमधून शस्त्रे घेऊन मुंबईत आला होता का? अशा सर्व गोष्टीचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, भगवंत सिंग हा भंगार विक्रेत्याचं काम करत होता, अशीही माहिती समोर येत आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. या दोघांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकणातील शिवकुमार गौतम आणि हत्येच्या कटात सहभागी असलेले अन्य दोन जण फरार आहेत.

आरोपींनी केला होता स्नॅपचॅटचा वापर

या प्रकरणातील आरोपींनी माहिती शेअर करण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर केला होता. तसंच, बाबा सिद्दिकींच्या हत्येतील आरोपीच्या फोनमध्ये बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दिकींचा फोटो आढळून आल्याचं वृत्त समोर आलं. हे छायाचित्र आरोपींसोबत त्यांच्या हँडलरने स्नॅपचॅटद्वारे शेअर केले होते. गोळीबार आणि कट रचणाऱ्यांनी माहिती शेअर करण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर केल्याचे तपासात उघड झालं आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी याआधी दिली होती.

Story img Loader