मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपीला लुधियाना येथून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. सुजित सुशील असे अटक आरोपीचे नाव असून त्याला लुधियानातील भामिया कला या भागातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सुजित मूळचा लखनौ येथील असून, लुधियाना येथे त्याचे सासर आहे. तो घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात वास्तव्याला होता. आरोपीने याप्रकरणातील आरोपी नितीन सप्रे व मोहम्मद झिशान अख्तर यांच्यासोबत पैशांचे व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही याप्रकरणातील १५ वी अटक आहे.