Baba Siddique Murder Son Zeeshan First Social Media Post : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. निर्मल नगर येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली आहे. या हत्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून त्यांनी या हल्ल्यातील काही संशयित आरोपींना विविध ठिकाणांहून अटक देखील केली आहे. त्यांची चौकशी देखील चालू आहे. या चौकशीतून वेगवेगळ्या प्रकारची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच वडिलांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र व वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी पहिल्यांदाच समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

झिशान सिद्दीकी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरांचं व त्यांचं संरक्षण करताना आपला जीव गमावला. माझं कुटुंब आज मोडून पडलंय. परंतु, माझ्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि त्यांचा संघर्ष व्यर्थ जाऊ नये असं मला वाटतं. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे”.

Ratan Tata Goa Dog dead
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांच्या निधनानंतर पाळीव श्वान ‘गोवा’ याचाही मृत्यू? व्हायरल मेसेजनंतर मुंबई पोलीस काय म्हणाले?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
baba siddique shot dead
“माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा, तो मुंबईला…”; बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया!
Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
Rohit Sharma Suryakumar Yadav Post on Ratan Tata Death Cricketing World Mourn on Tata Demise
Ratan Tata Death: “इतरांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी जगलात…”, रोहित शर्माची रतन टाटांसाठी भावुक करणारी पोस्ट; सूर्यकुमार यादवनेही व्यक्त केली कृतज्ञता
Supriya Sule slams Ajit Pawar group on Pune Accident
Supriya Sule slams Ajit Pawar group: “त्यांच्या दोन्ही हाताला रक्त…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर प्रहार; म्हणाल्या, “मी स्वतः त्यांच्याविरोधात…”
Sachin Tendulkar and his family at Union Minister Nitin Gadkari Nagpur residence
तेंडुलकर कुटुंबासह पोहोचला गडकरींच्या घरी…गडकरींनी दिला एकच सल्ला…
Salil Ankola Former Indian Cricketer Mother Found Dead in Pune Flat Wound Marks Found on Neck
Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा

हे ही वाचा >> बहराइच हिंसाचार : गोपाल मिश्रा हत्या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांचा गोळीबार; नेपाळ सीमेवर झालेल्या चकमकीत दोघे जखमी

हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर; एक ऑस्ट्रेलिया, एक टर्की तर तिसरं देशी

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांकडून पोलिसांनी तीन पिस्तुलं जप्त केली आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन बनावटीचं एक ग्लॉक पिस्तूल, टर्किश पिस्तूल आणि एक देशी बनावटीचं पिस्तूल असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

तो आरोपी अल्पवयीन नाही, ऑसिफिकेशन चाचणीनंतर सत्य समोर

या प्रकरणात सुरुवातीला गुरनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली होती. यापैकी धर्मराजने तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. ज्यानंतर त्याची ऑसिफिकेशन चाचणी म्हणजेच वय निश्चितीसाठीची हाडांची चाचणी करण्यात आली. ज्यात तो अल्पवयीन नाही हे समोर आलं आहे.

हे ही वाचा >> Ghaziabad Maid: “..म्हणून जेवणात लघवी मिसळली”, किळसवाण्या प्रकारानंतर मोलकरणीनं सांगितली धक्कादायक माहिती

आणखी एकाला अटक

याप्रकरणी फेसबुक पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या एका संशयित आरोपीच्या भावाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर (२८) असं या आरोपीचं नाव आहे. दोघेही भाऊ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.