Baba Siddique Shot Dead Breaking News: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे मुंबईतील एक प्रमुख नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असून त्यासंदर्भात पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकी त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यातल्या दोन जण पोलिसांच्या ताब्यात असून तिसऱ्याचा शोध चालू आहे.

Live Updates

Baba Siddique Death News Updates: बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या...

01:03 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Shot Dead: जयंतपाटील म्हणाले, "बाबा सिद्दिकींची हत्या ही फार लाजिरवाणी बाब"

माझे मित्र मा. मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब आहे. याआधी भाजपच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह करून हत्या करण्यात आली होती आणि आता बाबा सिद्दीकी यांची ही हत्या... आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. पुण्यासारख्या शहरात गँगवॉर हे तर नित्याचे झाले आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत हे सतत अधोरेखित होत आहे. आम्ही आधीपासूनच म्हणत आलो की, महायुती सरकारने महाराष्ट्राचा युपी बिहार केला आहे. पण आता परिस्थिती त्यापेक्षाही वाईट झाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या निमित्ताने प्रश्न पडतो आहे की सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाच सरकार सुरक्षित ठेवू शकत नसेल तर महाराष्ट्रातील जनतेला तरी हे कसे सुरक्षित ठेवतील?

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1845179974581465596

01:03 (IST) 13 Oct 2024
"बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी", अजित पवारांची प्रतिक्रिया

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे", असं अजित पवार यांनी म्हटलं आहे

https://platform.twitter.com/widgets.js

00:57 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Death News: अतिशय धक्कादायक - छगन भुजबळ

अतिशय धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईत अज्ञातांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला असून यात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक व मन सुन्न करणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्येला आठवडा होत नाही, तोच घडलेली ही घटना खूपच चिंताजनक आहे. राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व मुंबई पोलीस यांना माझे कळकळीचे आवाहन आहे की या दोन्ही प्रकरणांचा युद्ध पातळीवर तपास करून छडा लावण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. बाबा सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना.

https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1845172193602437174

00:53 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींच्या हत्येवर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट...

बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळीबार अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईतील बांद्रासारख्या ठिकाणी, त्यातही माजी राज्यमंत्र्यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीवर हा हल्ला होणं यातून राज्याची कायदा व सुव्यवस्थेची कोलमडलेली स्थिती कळते. मागील वर्षभर राज्यातील कायदा व सुव्यवस्था टांगणीला लागलेली आहे. प्रत्येक प्रसंगानंतर सत्ताधारी केवळ वेळ मारून नेत आहेत. पण हा हल्ला अत्यंत गंभीर असून याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यायलाच हवी. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटूंबियांना या संकट काळात सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना - जितेंद्र आव्हाड</p>

https://twitter.com/Awhadspeaks/status/1845166109970006150

00:52 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Death News: मनसे नेते बाळा नांदगावकरही लीलावती रुग्णालयात

बाबा सिद्दिकींच्या हत्येचं वृत्त कळताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लीलावती रुग्णालयात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

00:49 (IST) 13 Oct 2024
Baba Siddique Death News: अभिनेत्री शिल्पा शेट्टी रुग्णालयात दाखल

बाबा सिद्दिकींच्या हत्येचं वृत्त जाहीर होताच लीलावती रुग्णालयात अनेक राजकीय नेते व कलाकार मंडळी दाखल होत आहेत. अभिनेता संजय दत्त याच्यानंतर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीही रुग्णालयात दाखल झाली आहे.

00:48 (IST) 13 Oct 2024
Baba Siddique Death News: सरकार त्यांच्याच लोकांना सुरक्षा पुरवू शकत नाहीये, तर विरोधकांना काय सुरक्षा देणार? - वारिस पठाण

ही एक फार दुर्दैवी घटना आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येमुळे माझं वैयक्तिक नुकसान झालं आहे. बाबा सिद्दिकी हे माझे फार चांगले मित्र होते. हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. जर सरकार त्यांच्या स्वत:च्या नेत्यांना सुरक्षा पुरवू शकत नसेल, तर मग विरोधकांसाठी काय सुरक्षा पुरवणार? - वारिस पठाण, एमआयएम नेते

https://twitter.com/ANI/status/1845179130603786240

00:32 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Shot Dead: वाय दर्जाची सुरक्षा असूनही हत्या झाली - अनिल देशमुख

बाबा सिद्दिकींनी वाय दर्जाची सुरक्षा असतानाही त्यांच्यावर असा गोळीबार झाला. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे काय धिंडवडे निघाले आहेत, हे संपूर्ण जनता पाहात आहे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो - अनिल देशमुख</p>

00:27 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Death News: बाबा सिद्दिकींच्या हत्येवर आदित्य ठाकरेंचं ट्वीट...

"बाबा सिद्दिकींची हत्या प्रचंड धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. यातून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची स्थितीच स्पष्ट होत आहे. हे प्रशासन व कायदा व सुव्यवस्थेचं अपयश आहे", अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

https://twitter.com/AUThackeray/status/1845169323503124943

00:24 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Death News: घटनास्थळाची दृश्य...

बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडल्या त्या घटनास्थळाची ही दृश्य

https://twitter.com/ANI/status/1845175292614283522

00:23 (IST) 13 Oct 2024
Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींवर याच कारजवळ गोळीबार झाला

बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला त्या कारची दृश्य आता समोर आली असून कारच्या काचेवर गोळी लागल्याचंही दिसत आहे.

https://twitter.com/ANI/status/1845173573788332393

00:21 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Shot Dead: ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

बाबा सिद्दिकींच्या हत्येवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. "मुंबईत आज कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? जर उच्च दर्जाची सुरक्षा असणारेच सुरक्षित नसतील, तर सामान्य लोक किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय", अशी टीका त्यांनी केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1845171208175878409

00:17 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Death News: बाबा सिद्दिकींच्या हत्येवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया...

महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे याचंच हे द्योतक आहे. ही घटना दुर्दैवी आहे. सरकारची नामुष्की आहे. हे सरकारचं पाप आहे. अनेकांनी मंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. मी राजीनामा मागणार नाही. यांना आता जनताच पदावरून खाली उतरवेल - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

00:12 (IST) 13 Oct 2024
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने...”

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता राज्यात खळबळ उडाली आहे. तसेच राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वाचा -

00:12 (IST) 13 Oct 2024
"बाबा सिद्दीकी यांची हत्या ही चिंतेची बाब, सरकारने...", किरीट सोमय्यांनी सरकारकडे केली 'ही' मागणी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, बाबा सिद्दीकी यांची हत्या ही चिंतेची बाब आहे. राज्य सरकारने एक विशेष टीम बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. हे एक मोठे षडयंत्र असल्याचे दिसते. यामध्ये जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे", असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

00:11 (IST) 13 Oct 2024
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही कुणालाही...”

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता राज्यात खळबळ उडाली आहे. तसेच राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वाचा

00:10 (IST) 13 Oct 2024
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. वांद्रे येथील निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली. या हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा -

00:10 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Death News: "सत्ताधाऱ्यांचे हे हाल, तर सामान्यांचं काय?"

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जितक्या तीव्र शब्दांत निषेध करावा तितका कमी आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत याचे हे निदर्शक आहे. हल्लेखोरांना तातडीने पकडण्यात आले पाहिजे. सत्ताधाऱ्यांचे हे हाल तर सामान्यांचे काय? सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. बाबा सिद्दिकी यांच्या प्रकृतीला आराम पडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! गृह विभागाच्या अकार्यक्षमतेचा जाहीर निषेध! - सचिन सावंत

https://twitter.com/sachin_inc/status/1845144716112785845

00:09 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Death News: बाबा सिद्दिकींच्या हत्येवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

बाबा सिद्दिकींवर झालेल्या गोळीबाराची घटना निंदनीय असून त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. मी आत्ताच रुग्णालयातून आलो आहे. त्यांच्या कुटुंबाची मी भेट घेतली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जायला हवी - रामदास आठवले</p>

https://twitter.com/ANI/status/1845166709877112849

00:07 (IST) 13 Oct 2024
Baba Siddique Death News: हत्येचं वृत्त कळताच संजय दत्त लीलावती रुग्णालयात

बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याचं वृत्त समजताच अभिनेता संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल झाला. यावेळी त्यानं बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांचं सांत्वन केलं.

00:05 (IST) 13 Oct 2024
Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींच्या हत्येवर अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1845162849095778695

00:01 (IST) 13 Oct 2024

Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या, हरियाणा-यूपी कनेक्शनचा संशय; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात!

बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एक व्यक्ती फरार आहे.

वाचा सविस्तर

23:59 (IST) 12 Oct 2024
Baba Siddique Shot Dead: पोलिसांना घटनास्थळी ६ गोळ्या सापडल्या!

बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली त्या ठिकाणी पोलिसांना ६ काडतुसं सापडली असून त्यावरून त्यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. तीन हल्लेखोरांकडून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातल्या एकाचं नाव शिवा असल्याचंही सांगितलं जात आहे.

23:55 (IST) 12 Oct 2024
Baba Siddique Death News: बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया...

अतिशय धक्कादायक व मन हलवून टाकणारी ही बातमी आहे. माझं उभं आयुष्य या शहरात गेलं. आम्ही बिनधास्त इथे फिरले आहे. अशा ठिकाणी एक सत्तेत असणारा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या दोन नेत्यांचा एका आठवड्यात असे खून होतात आणि तरी त्यानंतर भुजबळांसारख्या मोठ्या नेत्याला पोलीस स्थानकात माहिती घेण्यासाठी जावं लागतं? या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचं चाललंय तरी काय? एका आठवड्यात सत्ताधारी पक्षाच्या दोन नेत्यांची हत्या होत असेल तर गृह मंत्रालय करतंय काय? गृहमंत्री काय करतायत? गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे - सुप्रिया सुळे</p>

23:52 (IST) 12 Oct 2024

Baba Siddique Death News: देवेंद्र फडणवीस लीलावतीमध्ये दाखल...

बाबा सिद्दिकींची हत्या झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1845155653259755554

23:50 (IST) 12 Oct 2024

Baba Siddique Death News: शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1845160098701717741

23:43 (IST) 12 Oct 2024

Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग?.

बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून त्या दिशेनं तपास चालू आहे.

23:41 (IST) 12 Oct 2024

Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींच्या हत्येबाबत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया...

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही दुर्दैवी घटना आहे. मी पोलिसांबरोबर चर्चा केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा, तर दुसरा हरियाणाचा आहे. एक आरोपी फरार आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थिती कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मी पोलिसांना दिले आहेत. तसेच कोणताही गँग डोक वर काढणार नाही, याची खबरदारी घेण्याचा सूचनाही पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

baba siddique shot dead news marathi

बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या (फोटो - संग्रहीत छायाचित्र)

Baba Siddique Death News Updates: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत...