मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी त्यांचे घर व कार्यालयाची दुचाकीवरून पाहणी करणाऱ्या हल्लेखोरांचा अपघात झाला होता. त्यामुळे हत्येच्या दिवशी दुचाकी न वापरण्याचा निर्णय हल्लेखोरांनी घेतला होता. त्यामुळे सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तासभर आधी येऊन तीनही हल्लेखोर दबा धरून बसले होते, अशी माहिती चौकशीत दिल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींनी ती दुचाकी पुण्यातून ३२ हजार रुपयांना खरेदी केली होती.

कुर्ल्यातील पोलीस पटेल चाळ येथे हल्लेखोर धर्मराज कश्यप, शिवकुमार ऊर्फ शिवा गौतम व गुरमेल सिंह राहत होते. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात प्रवीण लोणकर व शुभम लोणकर व मोहम्मद झिशान अख्तर यांच्याशी झालेल्या बैठकीत शिजला. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून नियमित वांद्रे परिसरात सिद्दीकी यांचे घर व कार्यालयाची पाहणी करायचे. त्यांनी दुचाकीवरून येऊन सिद्दीकींची हत्या करण्याचा कट रचला होता. पण पाहणी करताना दुचाकीचा अपघात झाला. त्यामुळे त्यांनी हत्येच्या दिवशी दुचाकी न वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हल्ल्याच्या दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबरला तासभर आधी हल्लेखोर वांद्रे पूर्वी येथे पोहोचले होते.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान
Traffic Control Cell of Mumbai Police received tip off that there is plan to kill Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान मोदींच्या हत्येचा रचला जात आहे कट, मुंबईत बॉम्बस्फोट होणार… ; वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला संदेश

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत, परेश मोकाशी यांच्या मु. पो. बोंबिलवाडीला हिटलर सापडला

आरोपी स्वत:सोबत एक शर्टही घेऊन आले होते. गोळीबार केल्यानंतर ते ओळख लपवण्यासाठी त्याचा वापर करणार होते, असे चौकशीत सांगितले. याशिवाय आरोपींनी पाहणी करण्यासाठी वापरलेली दुचाकी ३२ हजार रुपयांना पुण्यातून खरेदी करण्यात आली होती. घटनास्थळाजवळून पोलिसांना एक काळ्या रंगाची बॅग सापडली होती. त्यात पिस्तुल, एक आधार कार्ड आणि शर्ट होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकर हा हल्ला करण्यापूर्वीच घरातून पळून गेला. तसेच मोहम्मद झिशान अख्तर हादेखील हल्ल्याच्या दिवशी मुंबईत नव्हता. पण तो मोबाईलद्वारे आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती आरोपींनी चौकशीत दिली आहे.

हेही वाचा – सागरी प्राणी, पक्ष्यांच्या नोंदीसाठी ‘जलचर’ मोबाईल ॲप, बीएनएचएस आणि महाराष्ट्र कांदळवन कक्ष यांचा नवा उपक्रम

गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकर याला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली होती. याप्रकरणी गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी १५ पथके तैनात केली आहेत. दरम्यान, या संशयित आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. या संशयित आरोपींकडून दोन पिस्तुल, तीन मॅगझीन, २८ काडतुसे, पाच मोबाइल, दोन आधारकार्ड जप्त करण्यात आली होती.

Story img Loader