मुंबईमध्ये असलेल्या अनेक शिवमंदिरांपैकी एक असलेले रम्य आणि देखणे शिवालय म्हणजे बाबूलनाथ. मलबार हिल टेकडीवर वसलेले हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे मुंबईचा ऐतिहासिक वारसा. भक्तगणांचा सतत येथे वावर असतो. श्रावण महिना, महाशिवरात्र आणि अन्य महत्त्वाच्या धार्मिक दिवशी येथे भाविकांच्या रांगाच रांगा पाहायला मिळतात.
गिरगाव चौपाटीजवळून जाणाऱ्या बाबूलनाथ रोडवरून या मंदिराकडे जाता येते. मलबाल हिलवर असलेल्या या मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तत्पूर्वी मंदिराकडे जाण्यासाठी लागणारे प्रवेशद्वार अतिशय भव्य व सुंदर आहे. काळय़ा पाषाणातील या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
mv11पायऱ्या चढून वर गेल्यावर मंदिराचा मोठा सभागृह लागतो. सभागृहाचे खांब आणि मंदिर अतिशय सुंदर असून नक्षीकामाने भरलेले आहे. अनेक देव-देवतांच्या मूर्ती मंदिराच्या खांबावर कोरलेल्या आहेत. हे संगमरवरी मंदिर नागर स्थापत्यकलेचा नमुना समजले जाते. मंदिराच्या आतील आवारात केवळ शिवाचीच नाही, तर गणपती, पार्वती आणि मारुती यांचीही छोटेखानी मंदिरे आहेत. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर बाबूलनाथाचे शिवलिंग दिसते. या शिवलिंगावर सतत दही व दुधाचा अभिषेक सुरू असतो. हे तीर्थ गोमुखातून बाहेर पडते आणि ते घेण्यासाठी भाविकांची सतत झुंबड उडत असते.
या मंदिराचे नाव बाबूलनाथ का पडले याबाबत बऱ्याच आख्यायिका आहे. मात्र या टेकडीवर बाभळीचे झाड होते, या झाडाखालीच हे मंदिर बांधण्यात आल्याने बाबूलनाथ असे बोलले जाते. या मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती या बाराव्या शतकातील म्हणजे राजा भीमदेवच्या काळातील आहेत. त्याकाळी येथे छोटेखानी मंदिर होते, मात्र काळाच्या ओघात ते जमिनीत गाडले गेले. १८व्या शतकात येथे उत्खनन करण्यात आले आणि तिथे काळय़ा दगडातील शिवलिंग आणि मारुती, गणपती, पार्वती यांच्या मूर्ती सापडल्या. तिथे आणखी एक पाचवी मूर्ती सापडली होती, मात्र उत्खननादरम्यान ती भंग पावल्याने तिचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.
१७८०मध्ये या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर बांधण्याच्या वेळी ही जागा मुंबईतील पारशी समुदयाकडे होती. पारशी समुदयाचा मंदिर उभारण्यास तीव्र विरोध होता. शेवटी न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर या मंदिराचा मार्ग मोकळा झाला.
१८९०मध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि काही गुजराती व्यापाऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढे मुंबईतील उंच शिवमंदिर म्हणून या मंदिराची ख्याती वाढली आणि भाविकांची गर्दी होऊ लागली. आजही दर सोमवारी या मंदिरात भक्तगणांचा ओघ वाढलेला असतो.

बाबूलनाथ मंदिर, मलबार हिल
कसे जाल?
’ पश्चिम रेल्वेवरील ग्रांट रोड किंवा चर्णी रोड या स्थानकावरून बाबूलनाथ मंदिराकडे जाता येते. या स्थानकावरून टॅक्सी किंवा बसने बाबूलनाथ मंदिराजवळ जाता येते.

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
Mysterious Sanskrit text discovered in Germany
आश्चर्यच !…गूढ हिंदू मजकुराचा कागद जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये!